लालसिंग चड्ढा लवकरच ओटीटीवर

    26-Aug-2022
Total Views |

amir
 
 
 

नवी दिल्ली : मनोरंजन सृष्टीत ओटीटी माध्यम आल्यानंतर चित्रपट, नाटक, मालिकांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. कोरोना काळात या माध्यमाला अतिशय गती आली आणि प्रेक्षक यातच रुळलेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष जाऊन चित्रपट बघण्याची संख्या कमी होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला आमीर खानचा लालसिंग चड्ढा जबरदस्त अपयशी ठरला आहे. त्यामुळे लालसिंग चड्ढाला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक आणि ओटीटीवर खरेदीदार मिळत नव्हते. परंतु आता त्याचे निर्माते आणि आमीर खान यांच्या अडचणी कमी झाल्या असाव्यात.
आमिर खानचा चित्रपट 'लालसिंग चड्ढा'ला ओटीटी खरेदीदार मिळाला आहे. नेटफ्लिक्सने त्याचे सर्व ओटीटी हक्क विकत घेतल्याचे म्हटले जात आहे. तेही अगदी माफक दारामध्ये. अगोदर वृत्त होते, की नेटफ्लिक्स आमिरचा चित्रपट खरेदीसाठी उत्साहित होते.
 
 
 
परंतु 'लालसिंग चड्ढा'च्या निर्मात्यांनी नेटफ्लिक्ससमोर चित्रपटाची १५० कोटींची डिल ठेवली होती. मात्र नेटफ्लिक्सला ही डिल जास्त वाटली होती आणि ८०-९० कोटींची बोलणी झाली होती. परंतु बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटल्यामुळे ही किंमत ५० कोटींवर आली.
 
  
ही सर्व खटाटोप सुरु असताना आणखी एक वृत्त समोर आले ते म्हणजे नेटफ्लिक्सने लालसिंग चड्ढाबरोबर केलेला करार रद्द केला. त्यामुळे निर्मात्यांनी वेगळा प्लॅटफॉर्म शोधला आणि व्हूटबरोबर १२५ कोटींचा करार ठरवला. मात्र पुन्हा मोठा ट्विस्ट आला आहे. लालसिंग चड्ढाचे निर्माते आणि नेटफ्लिक्समध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली.
 
 
 
या दोघांनी फायद्याचा विचार केला. आमिरला नेटफ्लिक्समुळे जागतिक प्रेक्षक मिळेल. दुसरीकडे ओटीटीवर आल्याने चित्रपटाचे परदेशी व्यवसायमुळे फायदा होईल. त्यामुळे प्रेक्षक लालसिंह चढ्ढा आता नेटफ्लिक्सवर पाहू शकतील. हा चित्रपट प्रदर्शित झालेल्या तारखेपासून आठव्या आठवड्यानंतर तुम्हाला मोबाईलवर पाहाता येईल. चित्रपट निर्मात्यांनी आपले रेटही कमी केले आहेत.
 
 
 
वृत्तानुसार लालसिंग चड्ढाची नेटफ्लिक्सबरोबर डिल ८०-१२५ कोटी दरम्यान आहे. तरही १०० कोटींपेक्षा कमीच आहे. मात्र अजून ही डिलची अद्याप अधिकृतरित्या घोषित केलेली नाही. या चित्रपटाचे १५ दिवसांचे कलेक्शन फक्त ५८.७३ कोटी एवढेच झाले आहे.