मुंबई- दिवसेंदिवस वाढणारे फेसबुक युजर्स यामुळे अनेक समस्या युजर्ससाठीच्या वाढत आहेत. जर तुम्ही फेसबुकचा वापर करत असाल तर तुम्ही युझर फीड तपासून पाहा. त्यामुळे तुम्हाला नेहमीपेक्षा काही निराळं दिसू लागेल. जगभरात अनेक युझर्सना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. युझर्सना त्यांच्या फीडमध्ये काही अजब पोस्ट दिसत आहेत. कधी तुम्हाला एखाद्या सेलिब्रिटीचं अकाऊंट हॅक झाल्याचं वाटेल, तर काही वेळा तुम्हाला अनेक युझर्सची अकाऊंट हॅक झाल्याचं वाटेल.
यामागे हॅकिंगची शक्यता कमी असून टेक्निकल अडचण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फेसबुकवर सुरु असलेल्या या प्रकाराबाबत अद्याप कंपनीकडून कोणतीही सूचना देण्यात आली नाही. त्यामुळे अनेक युजर्सना त्यांचं अकाउंट हॅक झाल्यासारखे वाटत आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी १२ पासून फेसबुक फीडवर अनोळखी लोकांच्या पोस्ट दिसण्यास सुरवात झाली आहे. यासंदर्भात अनेक तक्रारीदेखील दाखल झाल्या आहेत. यामुळे अनेक फेसबुक युजर्स चा ओघ ट्विटरच्या दिशेने वळला आहे.