नुपूर शर्मा मनातलं नाही बोलल्या, जे होतं तेच बोलल्या : राज ठाकरे

    23-Aug-2022
Total Views |

Raj Thackeray
मुंबई : मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी समर्थन केलं आहे. त्यांची बाजू आपणच घेतल्याचे म्हणत त्या काही वेगळं बोललेल्या नाहीत, असेही राज म्हणाले. मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात आपल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात त्यांनी हा उल्लेख केला आहे. नुपूर शर्मांच्या वक्तव्याबद्दल यापूर्वीही एका मुलाखतीत त्यांनी समर्थन केले आहे. भारतातून फरार असलेल्या झाकीर नाईकनेही त्याच्या भाषणात हेच सांगितलं होतं जे नुपूर शर्मा बोलली होती, असेही राज म्हणाले.


राज ठाकरे म्हणाले, "आजपर्यंत आपण जितकी आंदोलनं केली. तेवढी इतर कुठल्याही पक्षाने केलेली नाहीत. मशिदीवरचे भोंगे काढा भोंगे काढा किती वर्ष सुरु होते. पण आपण याला पर्याय दिला. एकतर भोंगे काढा अन्यथा आपण तिथे येऊन हनुमान चालीसा भोंग्यावर लावू. हा प्रश्न सुटल्य़ाबद्दल मला मुस्लीम समाजातीलच लोकांनी सांगितलं आहे. असंख्य आंदोलनं झाली. तुम्ही हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. तुम्ही का दबून राहता.", असा सवालही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केला.

नुपूर शर्माबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "त्या नुपूर शर्मा यांनी वक्तव्य केलं. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. त्यावेळी मी त्यांची बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं तेच बोलत होत्या. तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लमानच आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती, त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही. त्याला माफी मागायला का सांगितलं नाही. ते बोलणं तुम्ही सोडून दिलं."