मुंबई- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीदेखील विरोधकांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी सुरुच ठेवली. विरोधकांनी आज 50-50 बिक्सिटचे पॅकेट दाखवत ’50 – 50 चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने नारेबाजी केली. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधकांनी केली.
तसेच, ‘आले रे आले गद्दार आले’, ‘विकास कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ’50 खोके 50 खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके’, ‘ईडी सरकार हाय, हाय, सीबीआय सरकार हाय, हाय’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.
विरोधकांनी 50-50 बिस्किटचे पॅकेट दाखवत असताना, आदित्य ठाकरे देखील यांच्यात सहभागी होते. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य राजेश टोपे यांनी आदित्य ठाकरे यांच्या हातातील बिस्कीटपुडा काढुन घेतला.