ओवेसी देवांबद्दल 'मनहूस' बोलला त्याला माफी मागायला लावली? : राज ठाकरे

    23-Aug-2022
Total Views |
raj thackeray
 
 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त  विधानामुळे अडचणीत सापडलेल्या नुपूर शर्मांचे समर्थन केले आहे. शर्मा यांची बाजू घेताना "नुपूर शर्मा जे बोलल्या होत्या, झाकीर नाईकनेही तेच सांगितले होते". "पण नाईकने माफी मागावी अशी कोणीही मागणी केलेली नव्हती", असे विधानकरून त्यानंतर राज ठाकरे यांनी एआयएमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर ठाकरी भाषेत तोफ डागली.
 
 
"त्यावेळी प्रश्न असा आहे कि #@#@# दोन भाऊ, ते ओवेसी". "त्यातला एक जण आमच्या देवी देवतांबद्दल बोलतो". "गणपती,लक्ष्मी यांच्या नावावर आक्षेपार्ह टिपणी करतो, पण त्याला कोणी माफी मागायला सांगत नाही", असा प्रश्न उपस्थित करताना देशात चांगले अल्पसंख्यांक बांधव असल्याची पुस्ती देखील ठाकरे यांनी जोडली. "यांच्या सारखे सगळेच #@#@ नाहीत", ओवेसीसारख्या लोकांवर कोणीही चाप का लावत नाही, त्यांच्या जिभेवर बंधन आणले जात नाही,अशी खंत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.
 
  
मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात आपल्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे यांनी संवाद साधला, त्यावेळी "आजपर्यंत आपण जितकी आंदोलनं केली, तेवढी इतर कुठल्याही पक्षाने केलेली नाहीत". तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून मशिदीवरचे भोंगे काढा ही मागणी सुरु होती. पण आपण याला पर्याय दिला असल्याचे सांगून आपल्या पक्षाने असंख्य आंदोलने केली, त्याबद्दल तुम्ही लोकांना सतत सांगितलं पाहिजे. तुम्ही का दबून राहता.", असा प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कान टोचले.