शिवाजी पार्कच्या दुरवस्थेसाठी आदित्य ठाकरेंची धोरणं कारणीभूत आहेत!

दै."मुंबई तरुण भारत"च्या "मुंबई ग्राऊड झिरो" विशेष मालिकेत उघड झाली होती पोलखोल

    22-Aug-2022
Total Views | 82

aditya thackeray



मुंबई :
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वात वरळीच्या जांबोरी मैदानावर घेण्यात आलेल्या दहीहंडीचा कार्यक्रम म्हणजे भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीचे फुंकलेले रणशिंग आहे, असे मानले जात आहे. भाजपने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमामुळे जांबोरी मैदानाची दुरवस्था झाल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला.

मात्र, भाजपसह स्थानिक रहिवाशांनी केलेल्या खुलाशामुळे शिवसेनेचे आरोप म्हणजे निव्वळ राजकीय धूळफेकच आहे, हे आता स्पष्ट होत आहे. वरळीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक रहिवाशांसह जांबोरी मैदानातून दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला असून जांबोरी मैदान सुस्थितीत असल्याचा दावा केला आहे.
याउलट शिवजी पार्क या मुंबईतील मैदानाची दुरवस्था होण्यासाठी आदित्या ठाकरे मंत्री असण्याच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामुळे दुरवस्था झाल्याचा आरोप खुद्द मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केले आहे. जांबोरी मैदानाबद्दलचा हा वादावर उत्तर देताना शिवाजी पार्कवरील २७ एकरात जी संपूर्ण वाट आदित्य ठाकरेंच्या कार्यकाळात शिवसेनेत सत्तेवर असणाऱ्या महापालिकेने लावली याबद्दल त्यांनी सवाल विचारला आहे.




२७ सेमी इतका मातीचा थर हवा होता तो केवळ तीन सेमी का राहिला? पाणी मारण्यासाठी दिलं जाणारं कंत्राट हे कुणाच्या खिशात पैसे मुरण्यासाठी दिलं होतं? मुंबई महापालिकेने तिथल्या साफसफाईची जबाबदारी दिलेल्या कंत्राटदाराशी तुमचा संबंध काय? २७ एकरच्या वाताहतीत तुमचं दुर्लक्ष का? जांबोरीसे प्यार और शिवाजी पार्कसे दुर्व्यवहार, असं का?, असा सवाल त्यांनी विचारला. जांबोरीवर हिंदुंचा सण झाला, मात्र, शिवाजी पार्कवर नमाजपठणाचा जेव्हा प्रयत्न झाला तेव्हा शिवसेनेने आणि आदित्य ठाकरेंनी विरोध का झाला नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं, असा सवाल शेलार यांनी विचारला आहे.

शिवाजी पार्कवर पावसाळापूर्व कामे करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोट्यवधींचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. मात्र, कंत्राटाला मंजुरी मिळाल्यानंतर कंत्राटातील काही त्रुटींवर आणि नमूद करण्यात आलेल्या काही गोष्टींवर बोट ठेवत स्थानिक दादरकर रहिवाशांनी स्वाक्षरी मोहीम राबवत या कामाला विरोध करायला सुरुवात केली होती.

या संदर्भात स्थानिकांनी वारंवार मांडलेली भूमिका दै. ‘मुंबई तरुण भारत’ने मांडली होती. दरम्यान, स्थानिक रहिवासी आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या लढ्याला यश आले असून प्रशासनाकडून अखेर शिवाजी पार्कवरील कामाशी संबंधित असलेले हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाच्या निर्णयावर स्थानिक रहिवाशांनी आनंद व्यक्त केला असून याप्रकरणी पाठपुरावा केल्याबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चे आभार मानले होते.

दरम्यान, “गेल्या सहा महिन्यांपासून शिवसेनेचे अनेक कार्यक्रम जांबोरी मैदानावर झाले, त्यावर कुणीही आक्षेप घेतले नाही. भाजपने जांबोरी मैदानावर घेतलेल्या कार्यक्रमासाठी प्रशासन आणि संबंधित विभागाकडून रीतसर परवानगी घेतली होती आणि त्यासाठी नियमानुसार भाडे भरले होते. भाजपचा कारभार पारदर्शक असून दहीहंडीच्या कार्यक्रम हा नियमानुसार झाला आहे,” असे भाजपचे वरळी विधानसभा अध्यक्ष दीपक पाटील यांनी म्हटले आहे.

शिवाजी पार्कवरील धुळीचा त्रास आणि त्यातून निर्माण होणार्‍या इतर समस्यांमुळे स्थानिक रहिवासी दादरकर हैराण झाले होते. लहान मुलांना आणि विशेषतः ज्येष्ठांना याचा अधिक त्रास होत होता. प्रशासनातील या विभागाचे तत्कालीन अधिकार्‍यांवर असलेल्या दबावामुळे आणि बालहट्टामुळे कोट्यवधींची अक्षरशः उधळपट्टी होत होती. आमच्यावतीने संबंधित कंत्राटदारावर नोंदविण्यात आलेले आक्षेपदेखील प्रशासनाने मान्य केले असून, पुढील कामासाठी काढण्यात आलेले तीन कोटींचे नवे कंत्राटसुद्धा प्रशासनाकडून रद्द करण्यात आले आहे.


भाजपचा वाढता प्रभाव शिवसेनेसाठी पोटदुखी

आम्ही 25 वर्षे शिवसेनेला खांद्यावर घेऊन नाचलो म्हणून भाजपला वरळीत संधी मिळाली नाही, पण आता भाजपही मैदानात उतरली आहे. भाजपने आयोजित केलेला दहीहंडीचा कार्यक्रम पक्षाच्या पलीकडे जाऊन आयोजित करण्यात आला होता. कारण त्या कार्यक्रमात विविध संघटना आणि अनेक गोविंदा पथकांनी स्वतःहून सहभाग घेतला होता. भाजपने घेतलेल्या कार्यक्रमाला सर्वसमावेशकतेचा स्पर्श होता. त्यातून भाजपची स्वीकार्हता आणि प्रभाव वाढत आहे, हे सेनेला लक्षात आले असून भाजपचा वाढता प्रभावच शिवसेनेसाठी पोटदुखी ठरत आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि आदित्य ठाकरेंवरील नाराजी या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली असून त्याचा हिशोब 2024 मध्ये नक्की होईल.

- दीपक सावंत, जिल्हा सरचिटणीस, भाजप


भाजपचा वाढता प्रभाव शिवसेनेसाठी पोटदुखी

आम्ही 25 वर्षे शिवसेनेला खांद्यावर घेऊन नाचलो म्हणून भाजपला वरळीत संधी मिळाली नाही, पण आता भाजपही मैदानात उतरली आहे. भाजपने आयोजित केलेला दहीहंडीचा कार्यक्रम पक्षाच्या पलीकडे जाऊन आयोजित करण्यात आला होता. कारण त्या कार्यक्रमात विविध संघटना आणि अनेक गोविंदा पथकांनी स्वतःहून सहभाग घेतला होता. भाजपने घेतलेल्या कार्यक्रमाला सर्वसमावेशकतेचा स्पर्श होता. त्यातून भाजपची स्वीकार्हता आणि प्रभाव वाढत आहे, हे सेनेला लक्षात आले असून भाजपचा वाढता प्रभावच शिवसेनेसाठी पोटदुखी ठरत आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि आदित्य ठाकरेंवरील नाराजी या कार्यक्रमातून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली असून त्याचा हिशोब 2024 मध्ये नक्की होईल.

- दीपक सावंत, जिल्हा सरचिटणीस, भाजप




अग्रलेख
जरुर वाचा
मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

मरीआई म्हसोबांच्या भक्तिपंथी रक्षणकर्ते ; कुंचीकोरवे कैकाडींचा अस्मितेचा जागर

कुंचीकोरवे कैकाडी समाजाची ‘आखाडी जत्रा’ ही केवळ धार्मिक परंपरा नसून, समाजाच्या अस्मितेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक सातत्याचा जिवंत पुरावा आहे. संत कैकाडी महाराज यांची शिकवण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील योगदानाची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन हा समाज सुसंस्कृत, जागरूक आणि समर्पित वाटचाल करीत आहे. हा विशेष लेख या परंपरेचा आणि समाजाच्या सांस्कृतिक-सामाजिक प्रवासाचा साक्षीदार ठरत, त्या अखंड परंपरेच्या गौरवाचा दस्तऐवज ठरावा, हाच उद्देश...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121