नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा पुढे ढकलली गेली आहे. याधी सोमवारी सुनावणी होणार होती पण आता परत ती पुढे ढकलण्यात आली आहे. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने केलेल्या परस्परविरोधी ५ याचिकांवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पीठ या प्रकरणी सुनावणी करणार आहे. आतपर्यंत झालेल्या तीन सुनावण्यांमध्ये काहीच निकाल न लागल्याने यावेळेस य प्रकरणाचा निकाल लागतो की नाही याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या प्रकरणाची सुनावणी हेच त्रिसदस्यीय पीठ करणार की, अजून मोठ्या खंडपीठाकडे या प्रकरणाची सुनावणी वर्ग केली जाणार याचाही निकाल उद्याच्या सुनावणीत लागण्याची शक्यता आहे.
१६ आमदारांची अपात्रता, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह, व्हीपचा वाद या सर्वच मिळून पाच याचिकांवर सुनावणी होणार आहे. शिवसेना नक्की कोणाची याचाही निकाल उद्याच लागणार की सुनावणी अजून पुढे जाणार याचाही निकाल उद्याच लागण्याची शक्यता आहे. याआधी ऑगस्ट महिन्यातच प्रथम ८, नंतर १२ आणि आता २२ अशी तीन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सध्याचे सरन्यायाधीश एस. व्ही. रमणा हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असल्याने आता निवृत्तीआधी महाराष्ट्रातील सत्तांघर्षावर रमणा सुनावणी पूर्ण करणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष आहे.
"उद्या काय होईल ते होईल, जनतेच्या भावना आपल्या सोबत" उद्धव ठाकरेंचा दावा
"उद्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत काय होईल ते होईल पण जनतेच्या भावना आपल्यासोबत आहेत" असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. आपल्याला सोडून गेलेल्या गद्दारांना जनताच धडा शिकवेल अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला निशाणा केले. जे गेले ते गद्दार आहेत त्यांच्यात निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, त्यामुळे जो पर्यंत माझ्यासोबत सामान्य शिवसैनिकांचा विश्वास आहे तोपर्यंत मला भीती नाही असा विश्वासही व्यक्त केला.