अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरची तब्येत बिघडली

जे. जे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु

    21-Aug-2022
Total Views |
 
Iqbal Kaskar  
 
 
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकराला प्रकृती अस्वास्थामुळे जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवार दि. २० ऑगस्टला दुपारी इक्बालच्या छातीत दुखू लागले. त्याला तळोजा तुरुंगातुन जे. जे. रुग्णालयात आणण्यात आले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.
 
 
पाकिस्तानमधुन भारतात परलेल्या इक्बाल. दाऊतची धमकी देत खंडणी वसुल करत असे. २०१७ मध्ये खंडणी वसुली प्रकरणी ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली. इक्बाल सध्या न्यायालयीन कोठडीत असून तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत गेल्या वर्षभरात ३ ते ४ वेळा आपला संपर्क झाल्याची इक्बाल कासकरने पोलिसांनी केलेल्या अटकेनंतरच्या चौकशीत कबुली दिली होती. दाऊदसोबत व्हिओआयपी कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. त्याचं आपल्या व्यवसायांवर नेहमी लक्ष असंत, अशी माहिती इक्बालने दिली. इक्बालने दाऊच्या पाकिस्तानमधल्या ३ घरांची माहिती पोलिसांना दिली होती.
 
 
दहशदवादी कारवायांमध्ये इक्बालचा समावेश
 
काही महिन्यांपुर्वी राष्ट्रीय तपास संस्थेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. हे लोक भारतात होत असलेल्या दहशदवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा दावा त्यावेळी तपास संस्थेने केला होता. पाकिस्तानतील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद, जमात-उद-दावा आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी त्यांचे संबंध आहेत. एनआयएच्या कारवाईनंतर ईडीने मुंबईतील दाऊदशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. या छाप्यांमध्ये दाऊद इब्राहिमची दिवंगत बहीण हसिना पारकर, इक्बाल कासकर आणि छोटा शकीलचा नातेवाईकाशी संबंधित ठिकाणांचा समावेश होता. ईडी दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांची बेकायदेशीर खरेदी आणि हवाला व्यवहारांची चौकशी करत आहे. ईडीने इक्बाल कासकरचीदेखील चौकशी केली आहे.