श्रीमान लेजंडच्या बर्थडेचं गाण युट्यूबवर घालतंय राडा

    02-Aug-2022
Total Views |

shreeman
 
 
मुंबई : आजकाल युट्यूब, इंस्टाग्रामसारख्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन सोशल मिडीया इन्फ्ल्यूअनसर तयार होत असतात. अशातचं यातील एक नाव जे महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असते ते नाव म्हणजे श्रीमान लेजंड. श्रीमान लेजंड मूळचा महाराष्ट्रातील रहिवासी आहे. त्याने ४ वर्षापूर्वी युट्यूबवर एका गेमिंग चॅनेलला सुरूवात केली. आणि आज बघता बघता त्याच्या चॅनेललवर प्रेक्षकांची गर्दी वाढत गेली. त्या गर्दीप्रमाणे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची संख्याही अगणित झाली.
 
 
 
 
श्रीमान हा गेमिंग शिवाय अनेक गोष्टींसाठी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनत गेला त्यातील एक गोष्ट म्हणजे त्याचे गाण्याचे कौशल्य. याच गाण्याच्या कौशल्याचा वापर करत श्रीमानवर प्रेम करणाऱ्या प्रितेश माने याने १ ऑगस्ट रोजी श्रीमानच्या वाढदिवसाचे अवचित्य साधत एक गाण प्रसारित केलं आहे. या गाण्याची खासियत म्हणजे स्वत: श्रीमान लेजंड आणि 'बड्डे आहे भावाचा' गाण्याचे गायक शेखर गायकवाड यांनी हे गाणं गायले आहे.
 
 
 
 
shreeman
 
 
१ ऑगस्ट रोजी श्रीमानच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रसारीत झालेल्या 'भाऊच्या बर्थडेला' या गाण्याने सध्या युट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या ७ तासांत या गाण्याने ५० हजार व्ह्यूजचा टप्पा पार केला. या गाण्याला प्रतिसाद देत स्वत: श्रीमानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून पोस्ट शेअर करत गाण्याची निर्मिती करणाऱ्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले आहेत.