अजून एका शिवसैनिकाने सोडली उद्धव ठाकरेंची साथ

नागपुरातील संपर्कप्रमुख शिंदे गटात

    18-Aug-2022
Total Views |

nagpur
 
नागपूर : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. नागपुरातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख असलेल्या मंगेश काशीकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काशीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. यामुळे विदर्भातील उद्धव ठाकरे गटाच्या अस्तित्वालाच मोठं धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. खासदार तुमाने, आमदार जयस्वाल यांच्यानांतर काशीकर हे शिंदे गटात जाणारे मोठे नाव आहे.
 
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती असलेल्या किरण पांडव यांची काशीकर यांनी नुकतीच भेट घेतली होती, त्यानंतर हा राजीनामा दिला आहे. या गळतीमुळे आगामी निवडणुकांत उद्धव ठाकरे गटासमोर अस्तित्वाचाचे मोठे आव्हान असणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेनंतरही उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटाकडे जाणाऱ्या लोकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे पुढे काय होणार? हे आता काळच ठरवेल.