मुंबई : विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे कुठलेही कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी भंडारा गोंदियातील महिलेवर झालेल्या अत्याचाराचा प्रकरण चर्चेसाठी आणण्याची मागणी केली.
यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत २८९ अंतर्गत या विषयाची तात्काळ चर्चा करण्यात यावी अशी मागणी केली त्यावरून पहिल्यांदा दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं. सभाग्रह जेव्हा पुन्हा सुरू झालं तेव्हा पुन्हा एकदा या विषयाची तत्काळ चर्चा करण्याची परवानगी सभापतींनी काही नियमानसह दिली मोजक्या सदस्यांनी यावर आपलं मत मांडावं, असं त्यांनी सांगितलं.
तेव्हा विरोधकांनी सगळे प्रश्न बाजूला ठेवून प्रश्न उत्तराचा तास बाजूला ठेवून या प्रकरणाची सखोल चर्चा व्हावी आणि यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायला अशी मागणी केली त्यावर विरोधी त्यावर सत्ताधारी पक्षाने असं सांगितलं की या प्रकरणाची सोमवारी विस्तृत चर्चा केली जाईल आणि काही घेणे या विषयावर कुठलीही चर्चा होऊ नये अशी सरकारने बाजू मांडली.
दुसऱ्यांदा सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब
यावेळी मनीषा कायंदे, एकनाथ खडसे, सचिन अहिर बोलले. चर्चा नेमकी कधी करायची ते निश्चित करण्यासाठी संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील, अनिल परब, शशिकांत शिंदे आणि सभापतींची चर्चा सुरू आहे.