सोशल मीडियावर रा.स्व.संघाची बदनामी करणे भोवणार! सायबर पोलीसांत गुन्हा दाखल

    17-Aug-2022
Total Views | 113

rss
 
पुणे : जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने व संघ तसेच संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासंबंधाने पोलिस, सायबर यंत्रणांनी वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार व आपली सर्वांची श्रद्धा असलेल्या महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे. पोलीस व सायबर क्राइम विभागाकडे या संदर्भात रीतसर तक्रार दाखल केली, असून पोलिस यंत्रणांनी तपास सुरू केला असल्याची माहिती श्री. करपे यांनी दिली.
 
रा. स्व. संघ व संघ विचारांनी चालणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याच्या हेतूने फेसबुकवर `RSS संघराज` नामक फेसबुक पेज व इतर संबंधीत सोशल मिडिया प्लॅटफॉर्मव्दारे देशभरातील नागरिकांच्या मनात श्रद्धास्थानी असलेल्या राजमाता जिजाऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली जाते आहे. त्यासोबतच कै. बाबासाहेब पुरंदरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरही हीन दर्जाची टिप्पणी करीत धादांत खोटा व अपप्रचार करणारा व हेतुपुरस्सरपणे संघाची बदनामी करणारा मजकूर व्हायरल केला जातो आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असेही श्री. करपे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हणले आहे.
 
`RSS संघराज` नामक फेसबुक पेज हे बनावट असून रा. स्व. संघाकडून वा स्वयंसेवकांकडून असा कोणत्याही प्रकारचा मजकूर प्रसिद्ध केला गेलेला नाही. रा.स्व. संघ व संघ स्वयंसेवकाची बदनामी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक असा मजकूर पसरवला जातो आहे. पोलिस व संबंधीत सायबर यंत्रणांनी याची दखल घेत चौकशी करावी व तातडीने कारवाई करावी अशी मागणी रा.स्व. संघाचे महानगर कार्यवाह श्री. महेश करपे यांनी केली आहे. दरम्यान पुणे सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121