
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सोमवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कैलासवासी शंकरराव झुंजारराव कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १ आणि गांधी चौक या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.
कडोंमपाच्या मुख्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 वा वर्धापन दिन आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाने संपन्न झाला. यावेळी महापालिका सचिव संजय जाधव,परिमंडळ एक चे उपायुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त अतुल पाटील, पल्लवी भागवत, अर्चना दिवे, वंदना गुळवेस सहा आयुक्त स्नेहा करपे, जे, अ,क, ड वर्गाचे सहा. आयुक्त, इतर अधिकारी वर्ग तसेच माजी पालिका सदस्य रवी पाटील, मोहन उगले आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. तर डोंबिवली विभागीय कार्यालय येथे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परिमंडळ दोन च्या उपायुक्त स्वाती देशपांडे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, फ व ग प्रभागातील सहा आयुक्त, माजी पालिका सदस्य तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. त्यानंतर डोंबिवली येथील वै. ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कॅ. विनयकुमार सचान स्मारकास आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पुष्पचक्र अर्पण क रून अभिवादन केले. तसेच स्फूर्ती स्थळाची देखील पाहणी केली.
भाजपाच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक व माजी नगरसेवक शैलेश धात्रक यांच्यातर्फे प्रभागात ध्वजारोहण करून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम पार पडला. यावेळी एका चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. लहानापासून वयोवृध्दार्पयत सर्वजण यावेळी उपस्थित होते.
शैलेश धात्रक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशासाठी चांगल्या प्रकारची कामे करीत आहेत. त्यांनी देखील अशीच कामे करीत राहोत. तसेच आमदार रविंद्र चव्हाण हे देखील डोंबिवलीसाठी चांगले काम करीत आहे असे सांगून त्यांनी कॅबिनेट मंत्री झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.
मनिषा धात्रक यांनी आम्ही प्रभागात आम्ही चांगली कामे करीत आहोत. आमच्याकडून चांगली कामे होत राहो. भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने सर्वानी आपल्या घरावर तिरंगा फडकविला आहे.
भाजपाचे माजी नगरसेवक साई शेलार यांनी शेलार चौकातील त्यांच्या कार्यालयाच्या समोर ध्वजारोहण करून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. यावेळी साई शेलार म्हणाले, दिवगंत शिवाजी शेलार हे त्यावेळी कॉग्रेस पक्षात होते मात्र तरीही त्यांनी झोपडपट्टीवासियांना आपल्याला आमदार रविंद्र चव्हाण यांना जिंकून दयायचे आहे असा आदेश दिला. त्यामुळे सर्वच झोपडपट्टीवासिया नेहमी रविंद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभे आहेत. आता देखील त्यांचे काम पाहून त्यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले आहे.
भाजपाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात नंदू परब यांच्या उपस्थिती ध्वजारोहण करण्यात आले. तर भाजपा पूर्व मंडल कार्यालयाजवळ नंदू जोशी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यापूर्वी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वामी विवेकानंद शाळेतील विद्याथ्र्यानी सहभाग घेतला होता. तसेच भाजपा पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील लेझीम खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पूनम पाटील, मितेश पेणकर, दत्ता माळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कैलासवासी शंकरराव झुंजारराव कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १ व गांधी चौक या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. या कार्यक्रमासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभाग,प्रशासन अधिकारी विजय सरकटे, कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव , अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांताचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, रमेश देशमुख व रानडे हे मान्यवर उपस्थित होते.ध्वजारोहण रमेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा जवरे यांनी अमृत महोत्सवानिमित्त राबवण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा' या उपक्रमाविषयी माहिती दिली. शाळा क्रमांक १ शाळा क्रमांक ९०/३ व शाळा क्रमांक ९२/५ या शाळांनी मिळून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अतिशय उत्साहाने विद्यार्थी कार्यक्रमास सहभागी झाले होते. पालकांनी सुद्धा तिरंगा वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.शाळेतील रामेश्वर घनमारे , वासंती भोईर, रामचंद्र काळे तसेच बालवाडी शिक्षिका कांता उगले, उर्दू माध्यमाच्या चांद व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी अतिशय उत्साहात कार्यक्रम पार पाडला.
शिंदे समर्थक राजेश मोरे आणि भारती मोरे यांच्यातर्फे प्रभागात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोहळा आयोजित करण्यात आला होता. दत्तनगर येथे डोंबिवलीतील सर्वात मोठा दीडशे फूटी ध्वज आहे. याठिकाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आला. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, हर घर तिरंगा या उपक्रमात प्रत्येक माणूस सहभागी झाला आहे. त्यामुळे एक वेगळाच उत्साह आहे. वेगवेगळ्य़ा विकासाची कामे भारतात झाली आहेत. महासत्ता होण्याकडे आपली वाटचाल सुरू आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्य़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच इंदिरा नगर कार्यालय येथे अंकुश गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहर सचिव समाधान तायडे, शहर उपाध्यक्ष अॅड सुभाष अंभोरे, शहर संघटक धम्मपाल सरकटे, चंद्रकांत वाढवे, मंगेश कांबळे, सुरेश नेरकर, उमेश साळवे, विश्वास समशेर आदी पदाधिकारी उपस्थित होते.