'प्रत्येकाला संरक्षण देणे आज शक्य नाही'

अनुपम खेर यांचे विधान

    16-Aug-2022
Total Views |

anupamkher
 
 
 
 
 
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांना आजही आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. आजही काही प्रमाणात हा नरसंहार असाच सुरु आहे. ३० वर्षांपासून सुरु असलेले अत्याचार आजही कायम आहेत. या बाबत अनुपम खेर यांनी पुन्हाएकदा विधान केले आहे.
 
 
 
 
अनुपम खेर म्हणत आहेत, 'आता दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटामुळे किमान आपण त्यांची वेदना समजू शकलो, या अन्यायाविरोधात आपल्या मनात ठिणगी पेटली. परंतु, आजही अशी गोष्ट भारतात घडतेय हेच ककिती लाजिरवाणी बाब आहे. फक्त काश्मिरी पंडितच नाही, तर त्यांना जे जे लोक पाठिंबा देत आहेत, त्यांना ही मारले जात आहे. या दहशतवाद्यांचा कितीही निषेध केला तरी कमीच; परंतु असे किती जणांना संरक्षण देता येईल? प्रत्येकाला संरक्षण देणे आज कितपत शक्य आहे? यासाठी गरज आहे मानसिकता बदलण्याची. जे निष्पाप आहे त्यांचा बळी जाताना बघून माझे मन सुन्न होते.'
 
 
 
 
अनुपम खेर पुढे म्हणतात, 'लोकांना काश्मिर फाईल्स काल्पनिक वाटत होता, त्यामुळे लोक मला आणि विवेकला टार्गेट करत होते, परंतु या सगळ्यामुळे हे खरोखर आपल्या देशात घडत आहे, हे किमान कळले. आणि ज्यांना हे सर्व काल्पनिक वाटत होतं त्यासाठी, ही एक चपराक आहे, असे म्हणावे लागेल.'
 
 
 
 
गेले अनेक दिवस आता लोक आजही सुरु असलेल्या हत्याकांडाविरोधात निदर्शनं करत आहेत. काश्मिरी पंडितांना स्वतःच्या घरात न घाबरता राहता यायला हवे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एक काश्मिरी पंडित सांगत आहेत की, 'अगदी आजही आमच्या इथे एका मुलाने आपला जीव गमावला आहे, ह्या लहानग्यांना तरी बळीचा बकरा बनवू नका. अशाने सर्वच काश्मीरकडे पाठ फिरवतील. ही मुले पुन्हा काश्मीरमध्ये येणार नाहीत किंबहुना आम्हीच त्यांना पाठवणार नाही.'