सावरकरांचे पोस्टर लावले म्हणून कर्नाटकात हिंदू युवकांची हत्या

कर्नाटकातील शिवमोगामधील घटना

    16-Aug-2022
Total Views |
shivmoga
 
बंगळुरू : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पोस्टर लावले म्हणून दोन हिंदू युवकांची कट्टरपंथीयांनी हत्या केल्याची घटना कर्नाटकातील शिवमोगा येथे घडली आहे. प्रेम सिंग आणि प्रवीण सिंग अशी या दोन तरुणांची नावे आहेत. कट्टरपंथीयांनी याची दिवसाढवळ्या चाकूने भोसकून हत्या केली आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेत आता पर्यंत ४ कट्टरपंथीयांना अटक करण्यात आली आहे. नदीम, अब्दुल रेहमान, तन्वीर आणि जबीउल्लाह अशी या चौघांची नावे आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त सावरकरांचे पोस्टर लावण्यावरून असलेल्या वादंगांनंतर ही हत्या झाली.
 
 
स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवमोगा मधील अमीर अहमद चौकात सावरकरांचे पोस्टर लावले गेले होते. या पोस्टरवर आक्षेप घेत काही कट्टरपंथीयांनी सावरकरांचे पोस्टर काढून त्या जागी टिपू सुलतानाचे पोस्टर लावण्याचा आग्रह धरला. या गोष्टीवरून दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीमध्ये या दोघांची चाकूने भोसकून हत्या केली गेली. या घटनेनंतर परिसरात उसळलेला तणाव आटोक्यात आणण्यासाठी जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. पोलिसांकडून शांतात आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करत पुन्हा एकदा धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांस कडक शासन केले जाईल, अशा सूचना पोलिसांकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
 
 
 
 
 
कर्नाटकचे सहाय्यक पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था अलोक कुमार यांनी अटक झालेल्या चौघांपैकी नदीम हा २०१६ साली शिवमोगा येथेच गणेशोत्सवानिमित्त असलेल्या हिंसाचारात एक आरोपी होता अशी माहिती दिली आहे. कर्नाटकातील कायदा - सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे कट्टरपंथीयांचे प्रयत्न सातत्याने समोर येत आहेत. स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांपेक्षा एकेकाळच्या अत्यंत जुलमी क्रूर शासक असलेल्या टिपू सुलतानाचे सातत्याने केले जाणारे उदात्तीकरण हा त्याचाच एक भाग आहे.