जागतिक स्तरावर गौरवलेले ख्यातनाम लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात एका माथेफिरूने चाकूने हल्ला केला. सध्या भारतात देखील नुपूर शर्माच्या पोस्टचे समर्थन केले म्हणून उमेश कोल्हेसह अनेकांच्या हत्या करण्यात आल्या. सलमान रश्दी यांच्यावरील हल्ला आणि नुपूर शर्मा समर्थन प्रकरणी सुरु असलेलं हत्यासत्र हे सगळ एकाच विचारधारेकडून सुरु आहे का आणि म्हणूनच विशिष्ट धर्मीय भारतात सुरक्षित नाहीत असे वैचारिक दळण दळणारे तथाकथित विचारवंत रश्दींवर झालेल्या हल्याने गप्प आहेत?
कोण आहेत सलमान रश्दी -
सलमान रश्दी हे भारतीय वंशाचे ब्रिटीश नागरिक आहेत. १९४७ साली भारतात एका काश्मिरी कुटुंबात जन्मलेल्या रश्दींचे गेल्या वीस वर्षांपासून ते अमेरिकेत वास्तव्या आहे. तत्पूर्वी ते ब्रिटन मध्ये राहायचे. सलमान रश्दींना बुकर पुरस्कारासह अनेक मोठ्या पुरस्काराने सन्मानित केले आहे. ग्रीशम नावाच्या त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन १९७५ साली झाले परंतु रश्दीं विरोधात मृत्यूचे फतवे निघायला लागले ते द सैटॅनिक व्हर्सेस या १९८८ साली प्रकाशित झालेल्या कादंबरी नंतर. १४ फेब्रुवारी १९८९ रोजी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहुल्ला खोमेनी यांनी रश्दींच्या हत्येचा फतवा काढला होता. त्यामुळे ब्रिटीश सरकार ने रश्दींना पोलिसांच्या संरक्षणात ठेवले होते.
दी सॅटानिक व्हर्सेसवर या सलमान रश्दी यांच्या पुस्तकावर कॉंग्रेसने बंदीका घातली -
खोमेनी यांनी रश्दींच्या मृत्यूचा फतवा जरी करण्याच्या काही काळ आधीच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी दी सॅटानिक व्हर्सेस या पुस्तकावर भारतात बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पुढे अशी बंदी घालणे ही राजीव यांची चूक होती, असे काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी २०१५ साली काबुल केलं होते. योगायोग असा कि सॅटानिक व्हर्सेसवरील बंदीच्या निर्णया थोडं आधीच देशातील अल्पसंख्यांक समुदायाला खुश करण्यासाठी राजीव गांधी यांनी शहाबानो यांच्यावर अन्याय केला होता असे बोलले जाते. आज राहुल गांधी अभिव्याकीच्या नावाने गळाकाढून अनेकदा रस्त्यावर उतरतात पण देशात ठराविक समाजाच्या दाढ्या कुरवाळण्याचे काम त्यांच्याच पूर्वजांनी केले आहे हे ते जाणून बुजून लपवतात.
तस्लिमा नासरीन यांना वाळीत टाकणारे डावे -
स्वतः डाव्य विचारांच्या असलेल्या तस्लिमा नासरीन या लेखिकेने जेव्हा लज्जा नामक कादंबरीद्वारे बांग्लादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली होती, तेव्हा स्वतःला पुरोगामी आणि सेक्युलर म्हणवणाऱ्या अनेक डाव्यांनी नासरीन यांच्या नावाने बोटे मोडली. पुढे बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी तर नासरीन यांचे द्विखंडितो हे बायोग्रफीक पुस्तकचं बॅन केली. कारण काय तर त्या पुस्तकामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे कारण पुढे केले होते. त्यामुळे कलाकाराने आमच्या सोई प्रमाणे अभिव्यक्त व्हावे असेच डाव्यांचे आणि कॉंग्रेसींचे धोरण आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
रश्दींच्या हल्याला कारणीभूत असलेली गोष्ट -
द सॅटॅनिक व्हर्सेसमध्ये रश्दींनी धार्मिक कथांचा आधार घेऊन ही कादंबरी रचल्याने जगभरातील धर्मांध जिहादी रश्दींवर खळवळले. पण अनेक भारतीय सिनेमात हिंदू देवदेवतांचा व प्रतीकांचा अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन अपमान केलेला असून देखील टोकाचा धार्मिक उच्छाद माडलेला नजरेस पडत नाही . या पुस्तकात आमच्या धर्माची निंदा केल्याचा आरोप करून द सॅटॅनिक व्हर्सेसला १९८८ पासून इराणसह काही इस्लामिक देशांमध्ये या पुस्तकावर बंदी घालण्यात आली. रश्दींना धर्मांध माथेफिरूनी अनेकदा धमकावण्याचा प्रयत्न केला परंतु या धमक्यांना भिक न घालता त्यांनी ९० च्या दशकात अनेक कादंबऱ्या लिहिल्या. २००७ मध्ये इंग्लंडच्या राणी दुसरी एलिझाबेथ यांनी त्यांना साहित्य क्षेत्रातील सेवांसाठी 'सर' ही मनाची पदवी प्रदान केली.
विशिष्ट समाजाच्या निष्ठा केवळ धर्मापर्यंतच सीमित आहेत का? -
आता रश्दींच्या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे देशातील अल्पसंख्यांक समाजाचा. जगभरातील घडामोडी पाहता ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे एका विशिष्ट समाजातील अनेकांच्या निष्ठा या केवळ त्यांच्या धर्मापर्यंतच सीमित आहेत. त्यामुळे आपल्या धर्माची वा धर्मग्रंथाची तर्कित चिकित्सा त्यांना मान्यच नसते. नुपूर शर्मा यांच्या डीबेत दरम्यान समोरच्याने केलेला शिवलिंगाचा अपमान चालतो पण स्वतःच्या धर्मग्रंथातील दाखले दिल्यास ते झोंबतात.
भारतात नुपूर यांच्या वक्तव्यानंतर अनेकांचे हत्या सत्र सुरु झाले पण स्वतःला लिबरल म्हणवून घेणारे अनेक लोक त्या प्रकरणी गप्पा राहिले आता सलमान रश्दीं सारख्या लेखक आणि जागतिक कीर्तीच्या विचारवंतांवर चाकूचा हल्ला झाला सुदैवाने अजून तरी ते जिवंत आहेत पण यावर आपल्याकडील कथित सेक्युलर मंडळी साधा निषेध तरी नोंदवणार आहेत कि नाही. एका भारतीय वंशाच्या आणि जगभारत गौरवलेले विचारवंत आणि लेखल सलमान रश्दी यांच्या वर झालेल्या भ्याड हल्याचा आम्ही निषेध करतो.