मुंबई : बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’मुळे सतत चर्चेत आहेत. अनेक मुद्द्यांमुळे हा चित्रपट वादाचे केंद्रस्थान ठरला आहे. बॉयकोट ‘लाल सिंह चड्ढा’ह्या ट्रेंड नंतरही हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. काही ठिकाणी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय तर काही भागांमध्ये या चित्रपटाचे शो प्रेक्षकच नसल्यामुळे रद्द करावे लागत आहेत. रिलीज झाल्यानंतरही ‘लाल सिंह चड्ढा’चा वाद कायम आहे. आता या चित्रपटासंदर्भात माहिती संदर्भात माहिती समोर येत आहे की, या चित्रपटाच्या फिल्ममेकर्स विरोधात आता FIR नोंदवण्यात आली आहे.
आमीर खानच्या जोडीने या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधातही तक्रार नोंदविण्यात आली आहे. ज्या लोकांनी ही तक्रार नोंदवली आहे त्यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, ‘लाल सिंह चड्ढा' भारतीय सेना आणि हिंदूच्या भावना दुखावणारा आहे. या तक्रारीमध्ये असेही म्हटले आहे की या चित्रपटामधील काही भाग हा आक्षेपार्ह आहे.
पुढे हे वकील सांगतायत, 'या चित्रपटात असे दाखविले आहे की भारतीय सेनेमध्ये एका 'विशेष' म्हणजेच गतिमंद मुलाला कारगिल युद्धात लढण्यासाठी पाठविले आहे. प्रत्येक नागरिकाला ही गोष्ट माहित आहे की, कारगिल युद्धातील सर्व जवान हे उच्च प्रशिक्षित होते. पूर्ण प्रशिक्षणानंतरच या जवानांना या मोहिमेवर पाठविले होते. परंतु हे सर्व ठाऊक असतानाही निर्मात्यांनी भारतीय सेनेचे नाव बदनाम करण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण केली आहे.'
एवढेच नाही तर याशिवायही अनेक प्रसंगांमध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील असे प्रसंग दाखवण्यात आले आहे. मूळ अमेरिकन चित्रपट 'फॉरेस्ट गम्प'चा ‘लाल सिंह चड्ढा' हा रिमेक आहे. आणि या चित्रपटात आमीर खान बरोबर करीना कपूर ही देखील मुख्य भूमिकेत दिसून येत आहे.