डुप्लिकेट का पहावा? 'Amazon' प्राईमचं घ्या! मूळ चित्रपट पहा!

    12-Aug-2022
Total Views | 128

ak
 
 
 ठाणे : बॉलिवूड अभिनेता आमिर खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. त्याचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट रक्षाबंधनाच्या खास मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर येताच बॉक्स ऑफिसवर धडकेल असा दावा केला जात होता. कारण आमिर दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याच्या चित्रपटासह परतला आहे आणि त्यातही तो करीना कपूरच्या बरोबर दिसला आहे. पण या अभिनेत्याचा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या अपेक्षेवर उतरू शकला नाही. चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती. एवढेच नाही तर २०२२ मध्ये आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या मोठ्या चित्रपटांच्या यादीतही 'लाल सिंह चड्ढा'ची अवस्था वाईट दिसत आहे.
 
हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप'चा अधिकृत रिमेक असलेल्या 'लाल सिंग चड्ढा'कडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. पण चित्रपट पाहिल्यानंतर या पैशात अ‍ॅमेझॉन प्राइमचे वर्षभराचे सबस्क्रिप्शन येते, त्यावर फॉरेस्ट गंपच बघावा ना. कशाला डुप्लिकेटसाठी डबल-टिबल-चौबळ खर्च करायचा? अशी सध्या प्रेक्षक वर्गाची भूमिका आहे.
 
आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, तेव्हापासून या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. अनेकांना अभिनेत्याच्या जुन्या वक्तव्याचा राग आला, तर काही लोकांना चित्रपटातील आमिरचा अभिनय आवडला नाही. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांनी 'लाल सिंग चड्डा'ला पाठिंबा दिला असला तरी तो कामी येत नाही. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल १८ कोटींची कमाई करण्याची अपेक्षा होती. मात्र, या चित्रपटाने केवळ १२ कोटींची कमाई केली, जी खूपच कमी आहे.
 
२०२२ च्या टॉप चित्रपटांच्या यादीत 'लाल सिंग चड्ढा'ची अवस्थाही वाईट झाली आहे. वर्ष २०२२ चे सात महिने उलटून गेले आहेत आणि या सात महिन्यांत 'KGF 2', 'RRR', 'भूल भुलैया 2', 'गंगूबाई काठियावाडी' सारख्या चित्रपटांसह इंडस्ट्रीतील अनेक मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांची कमाई आणि ओपनिंग डे कलेक्शनने सर्वांनाच चकित केले. 'KGF Chapter 2' या सिंगलने पहिल्याच दिवशी ५३.९५ कोटी रुपयांच्या ग्रँड ओपनिंगसह बॉक्स ऑफिसवर थक्क केले. पण 'लाल सिंग चड्ढा'ने 'KGF 2' च्या कमाईला दूरपर्यंत स्पर्श केलेला नाही. एवढेच नाही तर आमिर खानचा चित्रपट २०२२ च्या टॉप ५ चित्रपटांच्या यादीतही स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121