आरजेडीचा सत्ताकाळाला जंगलराजची उपमा देणाऱ्या नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा पलटी मारली आणि लालूंच्याच भाषेत सांगायचे झाल्यास नितीश यांनी सपाप्रमाणे कात टाकून भाजपची साथ सोडली. आता नितीश लालूंचा आरजेडी, कॉंग्रेस आणि निवडणुकीच्या आखड्यात मरणासन्न अवस्थेत असलेल्या डाव्यापक्षांसी संसार थाटणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आले. त्यात भाजप मित्र पक्षांना संपवतोय असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत भाजपवर केला. सध्या देशातील मोदी विरोधकांना नितीश यांच्या रूपाने मसीहा मिळाल्याने त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्यात. म्हणूनच काही दिवसांपूर्वी ज्या नीतीश कुमार यांच्या नावाने मोदी विरोधक बोटे मोडत होते, त्याच नीतीश कुमारांचे त्यांनी गोडवे गायल्यास आश्चर्य वाटायला नको.
नितीश कुमार यांचा राजकीय प्रवासातील काही महत्वाचे टप्पे आणि वेळो वेळी बदललेल्या भुमिकेबद्ल जाणून घेऊयात -
जनता दलातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नितीशकुमारांनी व्हीपी सिंग यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये कृषी राज्यमंत्र्यांची भूमिका निभावली असे सांगितले जाते. पुढे १९९० साली नितीश यांच्या मदतीने लालू बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि ९४ साली नितीश यांनी लालूंनविरोधात दंड थोपटून जॉर्ज फर्नांडीसांसोबत समता पक्षाची स्थापना केली. पुढे भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाहीत सहभागी झालेल्या नितीश कुमारांनी केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये रेल्वे मंत्री, कृषी मंत्री, वाहतूक मंत्री इत्यादी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.
२००३ साली त्यांनी जनता दल युनाईटेडची स्थापना केली. २००५ सालापासून भाजपच्या मदतीने बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या नितीश कुमारांनी २०१३ साली पुढील पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी नरेंद्र मोदींचे नाव पुढे येताच ते एनडीए मधून बाहेर पडले. पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या खराब कामगिरीनंतर नैतिक जबाबदारीचे कारण पुढे करून नितीशकुमारांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु फेब्रुवारी २०१५ सलीम पुन्हा एकदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले. मग नोव्हेंबर २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत लालूंच्या राष्ट्रीय जनता दलासोबत युती करून नितीश बिहारचे मुख्यमंत्री झाले. मधल्या काळात नितीश हे मोदींना पर्याय ठरतील असे दिवासप्न तथाकथित विचारवंतांना पडत होते.
पण २०२० साली तेजस्वी यादव यांच्यावर विखारी टीका करून नितीश यांनी अरजेडीशी घटस्पोट घेतला आणि भाजपशी घरोबा केला. त्यावेळी अनेकांचा भ्रमनिरास आणि जळफळाट झाला होता. आता नितीश यांची राजकीय निर्णयांवरून त्यांचे संधीसाधूपणाचे राजकारण समोर येते. त्यामुळे आपल्याला संपवण्याचे कारस्थान रचल्याने नितीश यांनी भाजपची साथ सोडली या चर्चेला काही अर्थ राहत नाही.
मग प्रश्न निर्माण होतो कि नितीश कुमारांनी भाजपशी कडीमोड का घेतला असावा -
देशभारत मोदींच्या विरोधी एखाद्या उमेदवाराचे नाव चर्चेत असते मग विरोधक एकत्र येतात फोटोसेशन करतात बातमी होते काही काळाने पंतप्रधानपदाच्या नेतृत्वावरून वादावादी होते त्याचीही बातमी होते आणि सगळे थंडावते. मधल्या काळात पच्छिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कधी ,महाराष्ट्रात येऊन ठाकरेंची भेट घेत तर दिल्लीत विरोधाकांनी एकजूट व्हावे म्हणून बैठक अयोजित करत पण सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहून ममतांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केल्याने त्यांच्या भुमिके विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होतय.
त्यामुळेच आपण मोदींना विरोध केल्यास मोदींच्या विरोधात आपल्याला विरोधकांतर्फे पंतप्रधानपदासाठी पाठींबा मिळू शकतो अशी नितीश यांना अशा असू शकते. कदाचित भावी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचे गाजर कॉंग्रेसने त्यांना दाखवले असावे अशाही चर्चा आहेत. नितीश यांची पंतप्रधानपदाची मनीषा कधीही लपून राहिलेली नाहीये हाच धागा त्यांना शरद पवारांशी जोडतो. ज्याप्रमाणे शरद पवारांची पंतप्रधानपदासाठी खटपट सुरु असते तशीच नितीश यांची सुरु असल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात.
पवारांना नितीश कुमारांची अवस्था उद्धव ठाकरें सारखी करायचीये का -
महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर विरोधकांतर्फे आपल्याला २०२४ ची पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवारांनी प्रयत्न सुरु केल्याचे बोलले जाते. आता स्वतःच्या कर्माने महाविकास आघाडी कोसळली आणि पवारांचे स्वप्न धुळीस मिळाले पण हे करताना चालाख पवारांनी अडीच वर्षाची सत्ता उपभोगली आणि ती उपभोगताना शिवसेनेच्या मतदार संघात राष्ट्रवादीची ताकद वाढवली.
ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेऊन सध्या नितीश बिहार मध्ये भाजप विरोधी महाआघाडी रचतायत आता त्यांची अवस्था उद्धव ठाकरें सारखी झाल्यास मोदी विरोधातला आपला एक मोठा प्रतीस्पर्धी आपोआप संपेल ही पवारांची धारणा असू शकते. त्यातूनच नितीश कुमार यांनी उचललेले पाऊल शहाणपणाचे असल्याची पवारांनी प्रतिक्रिया दिली. उद्या विरोधकांकडून नितीश यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चर्चेत आल्यास पवार आपली राजकीय भूमिका ३६०च्या अंशात बदलतील असा दावा त्यांचे विरोधक करतात.
प्रादेशिक पक्षांची अडचण काय ?
शिवसेनेच्या उठावाचे पक्ष नेतृत्वाकडून भाजप आणि हिंदुत्वापासून घेतलेली फारकत आणि पक्षातील आमदारांकडे केलेले दुर्लक्ष हे कारण असल्याचे सांगितले जाते. पण पक्षातील ही नाराजी घराणेशाहीच्या अतिरेकाने निर्माण झाल्याचे सांगितले जाते. घराणेशाही विरहीत पक्षबांधणीमुळे भाजपला देशभारातून मिळत असल्याचे मत राजकीय अभ्यासक मांडतात. पूर्वी बाळासाहेबांच्या करिष्म्यामुळे शिवसेनेला जनमत होते आणि पक्षात त्यांचा धाक होता पण तो करिष्मा आणि धाक उद्धव ठाकरेंजवळ नाही असे एकंदरीत परिस्थिती वरून म्हणावे लागेल. म्हणूनच उद्धव ठाकरे पक्षाची सूत्र आदित्य यांच्या हाती सोपवताय, पण आदित्य यांच्या यशाची शाश्वती नसल्याने मधेच तेजस ठाकरे यांच्या नावाची चर्चा होत असल्याचे सांगितले जाते.
शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा पक्षातूनच महत्वाच्या नेत्यांचे पंख छाटले जातात -
एखाद्या खुज्याप्रवृत्तीच्या नेत्याला लोकनेत्याची कायम भीती वाटत असते मग तो पक्षातील ताकदवर नेत्यांचे पंख छाटायला सुरुवात करतो त्याचा परिणाम पक्ष वाढीवर होतो. असा नेता नेहमी आपल्या अवती भोवती लोकमत नसलेल्या नेत्यांचा गोतावळा जमा करतो आणि त्यांना पक्षात महत्वाच्या स्थानी बसवतो. त्यातून आर्थिक,राजकीय,सामाजिक अशा सर्व स्तरातील भ्रष्टाचार माजतो. आता मायावती यांच्या नंतर त्यांच्या पक्षाचे भवितव्य काय? नवीन पटनायक यांच्या नंतर त्यांच्या बिजू जनता दलाला वाली कोण? मामात बॅनर्जी यांच्या नंतर तृणमूल कोन्ग्रेसचे काय होणार? खुद्द शरद पवार यांनी सुद्धा अजित पवार या आपल्या सख्या पुतण्याला मोठे होऊ दिले नाही अशा चर्चा सुरु असतात.
मग त्यातून नेतृत्वा विषयी असंतोष निर्माण होतो आणि त्याचे रुपांतर बंडात होते. आकालीदल किंवा शिवसेना यांच्या सह देशातील अनेक पक्ष हे व्यक्तीकेंद्रित झालेत. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या दावणीला बांधलेला नसलेला भाजप हा देशवासियांना योग्य पर्याय वाटतोय.