नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय तिढ्याविषयी सर्वोच्च न्यायाल
यात सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढील सुनावणी २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या महाराष्ट्रातील राजकीय तिढ्याविषयी सुनावणी सुरू आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न, बहुमत चाचणी आणि विधानसभा सभापतींची निवड यांच्यासह विविध याचिका प्रलंबित आहेत.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी होत असून प्रकरण घटनापीठाकडे पाठविण्याविषयी निर्णय होणे बाकी आहे. याप्रकरणी प्रथम १२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र या याप्रकरणी २२ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यावेळी प्रकरण घटनापीठाकडे पाठवायचे किंवा कसे, याविषयी निर्णय होणे अपेक्षित आहे.