साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंच्या विचारांचा विक्रोळीत जागर

    10-Aug-2022
Total Views |

Vikhroli 1
मुंबई : भारतीय जनता पक्ष, विक्रोळीतर्फे नुकतीच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीचे आयोजन सुरेश गंगादयाल यादव, जिल्हा भाजप सचिव यांच्या माध्यमातून विक्रोळीतील सेवालय कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी मातंग समाजातील कर्तृत्वान बंधू-भगिनींचा सत्कार करण्यात आला.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर यावेळी करण्यात आला. सत्कारमूर्तींनी यावेळी समाजातील स्थिती उलगडून दाखवली. गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाच्या संधींचा अभाव, महत्त्वाच्या राजकीय तसेच सामाजिक पदावरून डावलले जाते, अशा अनेक समस्या यावेळी उपिस्थित समाजबांधवांनी मांडल्या. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही जातीय विषमतेचे चटके समाजाला भोगावे लागतात, याचे अनुभवकथन यावेळी काहीजणांनी केले. जातीयता समाप्त व्हावी, समरस भारतीय म्हणून प्रत्येकाला जगता यावे, यासाठी समाजमन सुधारण्याची आवश्यकता आहे, असे काहीजणांनी मत व्यक्त केले.
 
 

Vikhroli 2 
यावेळी अण्णा भाऊ साठे महामंडळाची कार्यवाही, अ-ब-क-ड वर्गवारी आरक्षण यावरही चर्चा करण्यात आली. कार्यक्रमामध्ये प्रिकाश बाबर, अनिल देवकुळे, देविदास जाधव, गायत्री शिंदे, उत्तम तुपे, लक्ष्मण खवळे, विकी जाधव, पूजा वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यालयमंत्री सत्यवान भास्कर, महामंत्री, विक्रोळी म. मोर्चा श्रुती घोगले,युवती प्रमुख विक्रोळी, तृषाली भास्कर, महामंत्री प्रभाग क्र. १२२ विजेंद्र भेनवाल, उपाध्यक्ष, प्रभाग क्र. १२२ अनिकेत पवार , यु. मो. सचिव, कैलाश बोराना, महामंत्री झो. विक्रोळी,राजकुमार सोनी, निलेश म्हात्रे, कल्ली, मंजू यादव, मिता सावंत, सीमा चौहान, वनिता चौहान, सपना धारा, ज्योती जक्का उपस्थित होते.
या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सुरेश यादव म्हणाले की, “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या विचारानुसार कार्य करणारे समाजबांधव विक्रोळीमध्ये आहेत. आमचे खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाने समाजबांधवांना एकत्रित करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले.”