२५ मिनिटांच्या भाषणात राऊतांचा उल्लेखही नाही! : आदित्य ठाकरे कोकण दौरा
01-Aug-2022
Total Views |
मुंबई: शिवसेना आमदार तथा युवसेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. सोमवार दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे बोलत होते. या वेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी रौऊतांबाबत चकार शब्द देखील काढला नाही.
पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना ईडीकडून रविवारी रात्री अटक करण्यात आली. 'हम झुकेंगे नही' म्हणणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे. रविवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ७ दरम्यान ईडीचे पथक संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी पोहोचले होते. तब्बल नऊ तासांच्या चौकशी नंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ईडी कार्यालयात झालेल्या ८ तासांच्या चौकशी नंतर त्यांना अटक करण्यात आली. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी, 'मी अटक करून घेतोय' अशी एकाअर्थी कबुली राऊतांनी दिली होती. त्यामुळे 'कुछ भी हो जाए, हम झुकेंगे नही' म्हणणाऱ्या राऊतांचे सत्य बाहेर आले असून त्यांना सत्यपरिस्थितीसमोर त्यांना झुकावे लागल्याचे दिसत आहे. मात्र, आदित्य ठाकरेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.