विधानपरिषदेच्या सदस्यांचा शपथविधी संपन्न

    08-Jul-2022
Total Views |
 
legislative
 
 
मुंबई : जून महिन्यात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांचा शपथविधी शुक्रवारी पार पडला. विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सदस्यांना शपथ दिली. विधानपरिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी जून महिन्यात निवडणूक झाली होती. महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत भाजपने आपले सगळे उमेदवार निवडून आणले होते.
 
 
रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, अशोक ऊर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, उमा खापरे, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, सचिन अहिर या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. रामराजे नाईक - निंबाळकर यांनी याआधी विधानपरिषद सभापती म्हणून आणि प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद विरोधीपक्षनेते पद भूषवले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा निवडून आले आहेत.