कल्याणचा बुरुज ढासळला: ४० नगरसेवकांची ठाकरेंना सोडचीठ्ठी!

    08-Jul-2022
Total Views | 79
y
 
 
 

 
 
कल्याण: ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ४० नगरसेवकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. दिपेश म्हात्रे,माजी महापौर विनिता राणे अशा कल्याण,डोंबिवलीतील शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणे पसंत केले. येत्या काळात कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने कल्याणाच्या सत्तेचा बुरुज राखण्याचे आव्हान ठाकरेगटा पुढे उभे राहिले आहे.
 
 
शिंदेनी शिवसेनेत उठाव केल्या नंतर केडीएमसी मधील अनेक नगरसेवकांनी शिंदेना उघड उघड पाठींबा जाहीर केला होता. शिंदे यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत १५ ते २० नगरसेवकांनी हजेरी लावलेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा.श्रीकांत शिंदे कल्याण मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे शिंदे गटाला केडीएमसीमधून समर्थन मिळण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात येत  होती. 
 
 
येत्या काळात केडीएमसीमधील आणखी काही नगरसेवक व पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कल्याणच्या रूपाने उद्धव ठाकरे गटाच्या सत्तेला पडलेल हे भगदाड ते कसे बुजवतात आणि भविष्यत येऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतली सत्ता राखण्यात यशस्वी होतात का? हे प्रश्न उपस्थित होतात.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121