'डार्लिंग्ज'च्या टीझरने प्रेक्षक थक्क

आलिया भट्ट च्या "डार्लिंग्ज"चा टीझर प्रदर्शित

    06-Jul-2022
Total Views | 53

darlings
 
 
 
 
 
मुंबई : आलिया भट्ट ही नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांना थक्क करत असते, त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील खूप आहे. नुकताच तिच्या आगामी सिनेमा 'डार्लिंग्ज'चा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या माध्यमातून आलिया निर्माती म्हणून पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार आहे. 'डार्लिंग्ज' सिनेमात शेफाली शहा, विजय वर्मा, रोशनी मॅथ्यू यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. टीझरमध्ये आलिया आणि विजय वर्माचा रोमान्स आणि दोघांनी लगेच आईचा आशीर्वाद घेऊन केलेले लग्न हे सगळे पटापट उलगडत आहे असे वाटतानाचा सस्पेन्स वाढताना दिसतो. आलिया एका बेडकाची आणि विंचवाची स्टोरी बॅकग्राऊंडला सांगताना दिसतेय आणि यातच सिनेमा दडला आहे.
 
 
 
 
 
आलियाने टीझरचा व्हिडीओ शेअर करत इन्स्टाग्रामवर लिहिले आहे, ''हा तर फक्त टीझर आहे डार्लिंग्ज, ५ ऑगस्टला येतेय मी!''. सोशल मीडियावर 'डार्लिंग्ज'चा टीझर रिलीजझाल्या झाल्या लगोलग व्हायरल देखील झाला आहे. आलियाच्या चाहत्यांना टीझर भलताच आवडला आहे. ती नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांना थक्क करत असते त्यामुळे हा चित्रपट काही अपवाद असू शकत नाही, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कमी वयातच तिने एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे केले आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
५ ऑगस्टला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रीलिज होणार आहे. या सिनेमाची गाणी गुलजार यांनी लिहिली आहेत तर विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले आहे. आलियाने मागे एका मुलाखतीत 'डार्लिंग्ज' विषयी आपले मत स्पष्ट करताना लिहिले होते की, हा सिनेमा तिच्या खूप जवळचा आहे. निर्माती म्हणून तिची नवी इनिंग सुरु होते आहे असं देखील ती म्हणाली होती. त्याचबरोबर आलिया लवकरच रणबीरसोबत 'ब्रह्मास्त्र' मध्ये देखील दिसणार आहे. एवढेच नाही तर सध्या ती 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलीवूड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. आलिया भट्टचा 'डार्लिंग्ज'चा टीझर पाहून सिनेमा सस्पेन्सनी भरलेला अन् थ्रील वाढवणारा असणार हे मात्र नक्की आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121