हिंदुच्या रोजगारासाठी 'हिंदु रोजगार डॉट कॉम'सारख्या उपक्रमांची गरज!

श्री स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन : hindurozgar.com संकेतस्थळाचे अनावरण

    05-Jul-2022
Total Views |
 
 

hindu
 
 
 
 
मुंबई : हिंदू बंधु भगिनींना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांनी घेतलेल्या शिक्षणानुरुप संधी उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त आहे. 'हिंदू रोजगार डॉटकॉम'सारख्या व्यासपीठाद्वारे त्यांना ही संधी मिळेल, असे प्रतिपादन श्री स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी केले. हिंदूंना रोजगार देणाऱ्या 'हिंदू रोजगार डॉट कॉम' http://hindurozgar.com/ ) या संकेतस्थळाचे अनावरण श्री स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मंगळवार, दि. ५ जुलै रोजी दै.'मुंबई तरुण भारत', वडाळा येथील कार्यालयात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
भाजप मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी भाजप मुंबई उपाध्यक्ष पवन त्रिपाठी, मुंबई भाजपचे सचिव प्रतीक कर्पे, पाणिनी टेक्नोलॅब्सचे सहसंस्थापक हर्षल कंसारा आणि दै.'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
"हिंदू समाजातील तरुण - तरुणींना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न या संकेतस्थळाद्वारे होतो आहे याचा मला अतिशय आनंद आहे." अशा शब्दांत स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी आपले शुभेच्छा आणि आशीर्वाद या प्रसंगी दिले. आजच्या युगात तरुणांसाठी शिक्षणानुरुप व्यावसाय आणि रोजगार मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तरुणांची कारकिर्द घडवण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज आहे, कौतुकोद्गार त्यांनी यावेळी काढले. या उपक्रमाद्वारे होणाऱ्या प्रयत्नांचे महत्त्वही त्यांनी विशद केले. या संकेतस्थळाचा अनेक हिंदू तरुण तरुणींना नक्की फायदाच होईल, असा विश्वासही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला.
 
 
 
असा करा नोकरीसाठी अर्ज!
 
हिंदू तरुणांना रोजगार देणाऱ्या या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ करण्यात आली आहे.
नाव, मोबाईल क्रमांक, पिन कोड आणि वय इत्यादी माहिती नमूद केल्यानंतर नोंदणी पूर्ण होईल. तसेच, मोदी सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या भरतीबद्दल विस्तृत माहिती एका पीडीएफद्वारे या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. 'अग्निपथ' योजनेद्वारे अर्ज करण्यासाठी मार्गदर्शन यात करण्यात आले आहे.