मुंबई: राज्यपालांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सोमवारी दि. ०४ रोजी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात आला. सरकारच्या बाजूने १६४ आमदारांनी पाठींबा दर्शवला. यावेळी, आजवरचा प्रवास आठवताना, लढून शहीद होईन पण, आता माघार घेणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पण मी सुद्धा एक शिवसैनिक आहे. लढून शहीद होईन पण, आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यसाठी मी एकटा शहीद होईन, माझ्या बरोबर असलेल्या आमदारांचे राजकीय भविष्य धोक्यात येणार असेल तर मी स्वतः तुमचं भवितव्य सुरक्षित करून या जगातून कायमचा निघून जाईन. हे बोलताना एकनाथ शिंदे भावूक झाले. ते म्हणाले, . एक ग्रामपंचायत सदस्य सुद्धा इकडे तिकडे जायची हिम्मत करत नाही. परंतु, हे का झाले, कशासाठी झाले, याचे कारण न शोधता, मला गटनेता पदावरून काढून टाकले.
पुतळे जाळण्याचे आदेश दिले, घरावर दगडफेक करायचे आदेश द्यायचे. एकनाथ शिंदेच्या घरवर दगड मारण्याची हिम्मत करणारा अजून पैदा झालेला नाही. माझ्यावर प्रेम करणारी माणसं मधमाश्याच्या मोहोळासारखी माझ्या रक्षणासाठी उभी आहेत. गेली तीस वर्ष या एकनाथ शिंदेने जीवाचे रान केला आहे. रक्ताचे पाणी केले आहे. मी १७ वर्षाचा असताना बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये माझी आणि धर्मवीर आनंद दिघेंची भेट झाली. वयाच्या १८व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. दिघे साहेबांनी मला शाखा प्रमुख झालो. मी पहिल्यांदा नगरसेवक झालो त्याच्या पाच वर्ष आधी ही होऊ शकत होतो, परंतु मी कधी ही पदासाठी लालसा केली नाही.