बर्मिंगहम : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पहिलं रौप्य पदक मिळवलं आहे. भारताचा वेटलिफ्टर संकेत सरगर यांने 55 किलो वजनी गटात 248 किलोग्राम वजन उचलत ही कामगिरी केली आहे. तर मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद आणिक याने 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवले.
संकेतने क्लिन अॅड जर्क या फेरीत पहिल्या फेरीत 135 किलोग्राम वजन उचलंल. यामुळे संकेत सर्वाच्या पुढे जात स्नॅच फेरीमध्ये 113 किलोग्राम वजन उचलले. 135 आधिक 113 असे एकूण 248 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या प्रयत्नात 139 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्नात संकेतच्या हाताला दुखापत झाली. तिसरा प्रयत्न केला असता तो अयशस्वी ठरला. यामुळे त्याचा स्कोर अखेर 248 इतका राहिला.
मलेशियाच्या बिन कसदन मोहम्मद आणिक याने 142 किलोग्राम वजन उचलत पहिली फेरी पुर्ण केली. संकेतला मागे टाकण्यासाठी अजून 142 किलोग्रामची वजन उचलणं गरजेच होतं. मोहम्मदने तो प्रयत्न यशस्वी केला आणि 249 किलोग्राम वजन उचलत सुवर्णपदक मिळवलं. एका किलोच्या फरकाने संकेतचे सुवर्णपदक हुकले.
वडिलांना आराम करताना पाहायचं
संकेत सरगर हा मूळचा सांगलीचा असून त्याचे वडील पानाची टपरी चालवतात. हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या संकेतने राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड झाल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेत "राष्ट्रकुल स्पर्धेत मी सुवर्णपदक जिकलं तर मला वडिलांना मदत करायची आहे. त्यांनी माझ्यासाठी खुप कष्ट घेतले आहेत. मला आता त्यांना आंनदात ठेवायचं आहे." हलाखीच्या परिस्थितीतून प्रयत्नाच्या जोरावर, मेहनत आणि अथक परीश्रमातुन संकेतने मोठं यश संपादन केले आहे. याविषयी सर्वत्र संकेतच कौतुक होत आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीवर नाराजी
राष्ट्रकुल स्पर्धेतील संकेतने रौप्य पदक जिकल्यांवर सर्वत्र कौतुक असताना, एका किलोच्या फरकाने संकेतचे सुवर्णपदक हुकल्याने संकेतने नाराजी व्यक्त केली. "मी खूप नाराज आहे. मला स्वत:चा राग येतोय. मी सुवर्णपदकासाठी तयारी केली होती." अशा शब्दांत संकेतने नाराज होत प्रतिक्रिया व्यक्त केली.
Exceptional effort by Sanket Sargar! His bagging the prestigious Silver is a great start for India at the Commonwealth Games. Congratulations to him and best wishes for all future endeavours. pic.twitter.com/Pvjjaj0IGm
संकेतने रौप्य पदक जिकल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकेत सरगरला शुभेच्छा दिल्या, "संकेत सरगरचा विलक्षण प्रयत्न! रौप्यपदक ही भारताची प्रतिष्ठा वाढवणारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चांगली सुरुवात आहे. त्याचं अभिनंदन आणि भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा."