देशद्रोह्यांच्या आवळल्या मुसक्या: राजस्थान पोलीसांची मोठी कारवाई

    03-Jul-2022
Total Views |
 
y
 


राजस्थान  : अब्दुल सत्तार, नितीन यादव आणि राम सिंग या तीन आरोपींना पाकिस्तानी गुप्तचर संघटनेला माहिती पुरवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली  आहे. ऑपरेशन सरहद अंतर्गत राजस्थान सीआयडी इंटेलिजेंस पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेले तिघेही पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI ला महत्त्वाची माहिती देत असल्याचे तपासात उघड झाले.
 
 
सोशल मिडिआच्या माध्यमातून पुरवली शत्रूराष्ट्राला माहिती
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अब्दुल सत्तार हा २०१० पासून नियमितपणे पाकिस्तानात जात असल्याचे समोर आले. तसेच सत्तार हा आयएसआयचा स्थानिक एजंट म्हणून काम करत असल्याचे त्याने काबुल केले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपण अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पुरवली व त्याबदल्यात पाकिस्तानकडून आपल्याला पैसे मिळाल्याचे अब्दुल सत्तारने अधिकाऱ्यांना सांगितले.
 
 
  
पाकिस्तानी महिला एजंटकडून हनी ट्रॅपचा वापर
दुसरा आरोपी नितीन यादव हा राजस्थानमधील सुरतगड भागातील रहिवास असून तेथील कॅण्टोलमेंट परिसरात फळे, भाजीपाला विकण्याचे काम करतो. त्याच्या कामामुळे प्रतिबंधित भागात त्याचा सतत वावर असतो. सुरुवातीला हानी ट्रॅपचा वापर करून पाकिस्तानी महिला एजंटने आपल्याला जाळ्यात ओढल्याचे नितीन यादव याने सांगितले व त्याबदल्यात आपल्याला पैसे मिळत असल्याचे यादवने काबुल केले.
 
 
 
सीमावर्ती भागाचे महत्त्वाचे व्हिडीओ, छायाचित्रे आणि माहिती दिली.
या प्रकरणात अटकेत असलेला तिसरा आरोपी रामसिंग हा एका कारखान्यात काम करतो. रामसिंग ने आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेल्या सीमा चौकी आणि सीमावर्ती भागाचे महत्त्वाचे व्हिडीओ, छायाचित्रे आणि माहिती आयएसआयला दिलेली आहे. या या तिन्ही आरोपींच्या  फोनवरून  महत्त्वाची माहिती मिळाली असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आले.