अ'धीर' रंजन म्हणजे काँग्रेसचे राऊत : अशी आहे वादग्रस्त वक्तव्यांची मालिका!
29-Jul-2022
Total Views |
37
मुंबई: काँग्रेसचे अधीर रंजन चौधरींच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण होणे यात नवीन काहीच नाही. या पूर्वीही अनेकदा बेताल वक्तव्ये करून तोंडघशी पडले आहेत. यावेळी, त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा “राष्ट्रपत्नी” असा उल्लेख केला आहे, आणि सभागृह तहकूब करावे लागले.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाविरोधात (ईडी) काँग्रेसच्या निषेधादरम्यान चौधरी यांनी ही टिप्पणी केली. ते म्हणाले, “हो, आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ, भारताचे राष्ट्रपती नव्हे राष्ट्रपत्नी सर्वांसाठी आहेत.”
“मी राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही. ती फक्त एक चूक होती. जर राष्ट्रपतींना वाईट वाटले असेल तर मी त्यांना वैयक्तिकरित्या भेटेन आणि माफी मागेन. त्यांना हवे असल्यास ते मला फाशी देऊ शकतात. मी शिक्षा भोगायला तयार आहे पण सोनिया गांधीना यात का ओढले जात आहे? चौधरी म्हणाले. यापूर्वी देखील अनेक वेळा त्यांना त्यांच्या वक्तव्यामुळे वादाला सामोरे जावे लागले आहे, त्याचीच काही उदाहरणे.
'ते' ट्विट केले डीलीट
21 मे रोजी राजीव गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, चौधरी यांच्या अधिकृत हँडलवरून राजीव गांधी यांचे एक वादग्रस्त विधान असलेले इन्फोग्राफिक पोस्ट केले. शीखविरोधी दंगलीनंतर, राजीव गांधी एका सार्वजनिक मेळाव्यात म्हणाले होते : "जब भी कोई बडा पेड गिरता है, तो धरती थोडी हलती है (जेव्हा एक मोठा वृक्ष पडतो, पृथ्वी हादरते)." नंतर, "माझ्या स्वतःच्या निरीक्षणाशी काहीही संबंध नाही" असे ट्विट प्रथम पोस्ट केले असूनही त्यानंतर त्याच्या अधिकृत हँडलवरून ट्विट डिलीट केले.
अर्थमंत्र्यांचाही केला होता अपमान!
संसदेच्या २०१९ सालच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, याच बहरामपूरच्या खासदाराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचा विपर्यास केला आणि त्यांना ‘निर्बाला’ म्हणजे कमकुवत म्हटले.
जम्मू काश्मीरबद्दल वादग्रस्त वक्तव्य!
जेव्हा भाजप सरकारने कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला तेव्हा चौधरी यांनी कलम ३७० आणि जम्मू-काश्मीर राज्याची अंतर्गत बाब आहे का, असा प्रश्न सरकारला विचारून वादळ उठवले. चौधरी यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अस्वस्थ सोनिया गांधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे हावभाव करताना दिसल्या.
युरोपियन शिष्टमंडळाचा 'भाडे के तट्टू', असा उल्लेख
कलम ३७० रद्द केल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट दिलेल्या युरोपीयन संसद सदस्यांविरुद्ध त्यांनी अपमानास्पद टिप्पणी केल्यावर त्यांनी पुन्हा एक वाद निर्माण केला. युरोपियन शिष्टमंडळाच्या भेटीबद्दल बोलताना त्यांना “किराये के तट्टू ” असे म्हणत त्यांनी भारतीयांना रोखल्याबद्दल सरकारवर टीका केली.
नरेंद्र मोदी, अमित शहा हे ‘परप्रांतीय’
नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स वरून राजकीय शब्दयुद्ध सुरू असताना चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना “प्रवासी” म्हटले. “हिंदुस्थान सर्वांसाठी आहे, हिंदू आणि मुस्लिमांसाठी आहे. मी म्हणू शकतो की अमित शहा जी, नरेंद्र मोदी जी, तुम्ही स्वतः बेकायदेशीर स्थलांतरित आहात. तुमचे घर गुजरात आहे, तुम्ही दिल्लीला आलात, तुम्ही स्वतः परप्रांतीय आहात,” असे वक्तव्य केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान
तसेच २०१९मध्ये प्रताप सिंग सारंगी यांनी मांडलेल्या धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना या पश्चिम बंगालमधील काँग्रेस खासदाराने पंतप्रधान मोदींची तुलना इंदिरा गांधीशी केली. ते पुढे म्हणाले की, “गंगा आणि गंदी नाली (घाणेरडी नाली) यांची तुलना होऊ शकत नाही”.