मुंबई : "अल्ला ताला से दुआ करती हूँ की उद्धव ठाकरे काम्याबी हो" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातून सर्व पुरोगामी संघटनांकडून शुभेच्छा येत आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरेंची स्तुती करत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्यासारख्या पुरोगामी विचारांच्या बाईने शिवसेनेनेत का प्रवेश केला? असा मला प्रश्न विचारला जातोय, मी शिवसेनेत प्रवेश केला कारण उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे शेंडी - जानव्याचे हिंदुत्व नाही असे म्हणत शिवसेनेच्या हिंदुत्वाला आपलेच सर्टिफिकेट सुषमा यांनी देऊन टाकले.
भाजप विरोधात लढण्यासाठी सर्वच समविचारी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे आणि चांद्यापासून ते बांद्यापर्यंत शिवसेना मजबूत करण्यासाठी मी आता काम करेन असा दावाही अंधारे यांनी केला आहे. राज्यातील सर्वच पुरोगामी संघटना, मुस्लिम संघटना य फक्त भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेनेच्या ओबत यायला तयार आहेत, "हमारा पैगाम उनको देना की हम उनके साथ है' असे संदेश मला येत आहेत असेही सुषमा यांनी सांगितले. माझ्यासोबत आज माझ्या सहकारी नव्हे तर माझी लढणारी साठी माझ्यासोबत आली आहे असे सांगत उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंचे शिवसेनेत स्वागत केले.