जाणून घ्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलेबद्दल

सलग दुसऱ्या वर्षीही राखले स्थान

    28-Jul-2022
Total Views |

roshni
 
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून रोशनी नाडर यांनी सलग दुसऱ्या वर्षीही आपले स्थान कायम राखले आहे. भारतातील पहिल्या तीन माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमधील एक असलेल्या एचसीएल टेकनॉलॉजिजच्या रोशनी नाडर या अध्यक्ष आहेत. कोटक प्रायव्हेट बँकिंग आणि हुरून यांनी संयुक्तपणे भारतातील सर्वात श्रीमंत महिलांची सूची प्रकाशित केली होती त्यात रोशनी नाडर यांचे नाव ८४, ३३० कोटी रुपये संपत्तीसह अग्रस्थानी आहे.
 
 
 
२०२१ या एकाच वर्षात रोशनी यांच्या संपत्तीत ५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. सौंदर्य प्रसाधनांमधील मोठा ब्रँड असणाऱ्या नायकाच्या फाल्गुनी नायर यांनी ५७, ५२० कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. जेटसेटगो या खासगी विमान कंपनीच्या कनिका टेकरीवाल यांनी अवघ्या ३३ व्य वर्षीच या यादीत स्थान मिळवत या यादीत स्थान मिळवणारी या वर्षीची सर्वात तरुण महिला म्हणून स्थान पटकावले आहे.