'माजी मुख्यमंत्री' उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून शुभेच्छा

    27-Jul-2022
Total Views |
 

shinde
 
 
 
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख हा शिवसेनाप्रमुख न करता माजी मुख्यमंत्री असा केला आहे. या उल्लेखामुळे शिंदे गटाचे नेमके पुढचे बेत काय? हा प्रश्न उभा राहतोय.
 
."महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना" असे ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची कामना केली आहे. पण देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेनाप्रमुख असा न करता माजी मुख्यमंत्री असाच केला आहे.