मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दहीहांडी, गणेशोत्सोव आणि कोरोना काळातील केसेस मागे घेण्याचा निर्णय

    27-Jul-2022
Total Views |
 
cabinet meeting
 
 
 
मुंबई : बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना वीज दरात उपसा सिंचनामागे प्रती युनिट सवलत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये देण्यात येतील. तसेच वीज दरात उपसा सिंचनामागे प्रती युनिट एक रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
 
 
या बैठकीत ग्रामीण भुमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. पैठणमधील उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 40 गावांना याचा फायदा होणार आहे. हिंगोली जिल्हात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला 100 कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आली.
 
 
 
 
 
 
 
तसेच दही हांडी आणि गणेश उत्सवात कार्यकर्त्यांवरील झालेल्या केसेस मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना काळात झालेल्या केसेस देखील मागे घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.