'या' कारणामुळे मुख्यमंत्री पोहोचले थेट रतन टाटांच्या घरी!

    27-Jul-2022
Total Views | 179

Shinde - Tata
 
 
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची बुधवारी (दि. २७ जुलै) त्यांचा कुलाबा इथल्या निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून रतन टाटा यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री तिथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या.
 
 
पत्रकारांशी संवाद साधताना आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देण्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, “जी कामं घाईगडबडीत मंजूर करण्यात आली, त्यांनाच सध्या स्थगिती देण्यात आली आहे. इतर अत्यावश्यक कामांना स्थगिती दिलेली नाही. सरकार बदललं म्हणून कोणतीही लोकहिताची, अत्यावश्यक, विकासकामं रद्द होणार नाहीत.”
 
 
 
 
मुख्यमंत्र्यांनी 'शिवसेना पक्षप्रमुख' उल्लेख टाळला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना ट्विटरच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख माजी मुख्यमंत्री असा केला आहे, यात 'शिवसेना पक्षप्रमुख' उल्लेख टाळल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना,” असे ट्वीट त्यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा अशाच स्वरूपात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121