भारतात लवकरच मंकीपॉक्सवर लस ?

    27-Jul-2022
Total Views | 34
 

poonavalla
 
 
 
मुंबई : जगभर थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्स या आजारावरच्या लशीबद्दल भारताच्या सीरम इन्स्टिट्युटच्या आदर पूनावाला यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. मंकीपॉक्स वर लस विकसित करण्यासाठी सीरमची नोवोवॅक्स कंपनीशी चर्चा सुरु असल्याची माहिती पूनावाला यांनी दिली आहे. जगभरात थैमान घालणाऱ्या १७४हुन जास्त देशांत रुग्ण सापडलेल्या मंकीपॉक्सला जागतिक आणीबाणी घोषित केली आहे.
 
 
सीरम इन्स्टिट्युट कडे या आजारावर लस निर्मितीची पुरेशी क्षमता आहे. त्यासाठी जगभरातील लसनिर्मिती कंपन्यांशी आम्ही चर्चा करत आहोत असेही पूनावाला यांनी सांगितले. भारतीयांसाठी संपूर्ण सुरक्षित लस निर्माण करून त्यांच्या पुरेशा चाचण्या करून ती लस भारतीयांसाठी उपलब्ध करून देण्यास वर्षभराचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे जलदगतीने उत्पादन करण्यासाठी सर्व परवाने लवकर मिळवण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत असे आदर पूनावाला असे सांगितले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांचे देहावसान

राष्ट्र सेविका समितिच्या चतुर्थ प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे (९७) यांचे गुरुवार, दि. ३१ जुलै रोजी देहावसान झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवाचे देहदान शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एम्समध्ये केले जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि १५ दिवसांपासून त्यांची तब्येत आणखी बिघडत चालली होती. वंदनीय प्रमिलताईंचे संपूर्ण जीवन अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक होते. कठोर परिश्रम करणाऱ्या महामेरू प्रमिलताई शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रीय विचारांशी एकरूप राहिल्या...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121