नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रुपदी मुर्मू यांचा शपथविधी संपन्न

सरन्यायाधीश रमण्णा यांच्याकडून दिली गेली राष्ट्रपतीपदाची शपथ

    25-Jul-2022
Total Views |






नवी दिल्ली :देशाच्या १५ व्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवन परिसरात संपन्न झाला. राज्यघटनेनुसार देशाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात, त्याप्रमाणे देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. आपला देश आपल्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करत असताना प्रथमच एक वनवासी समाजातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होत आहे हा एक दुग्धशर्करा योगच आहे. 


देशाचे राष्ट्रपती भवन हे पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश व्हाइसरॉयचे निवासस्थान होते. स्वातंत्र्यांनंतर तेच आपले राष्ट्रपती भवन झाले. त्यावेळच्या प्रथेप्रमाणेच राष्ट्रपतींना शपथविधीनंतर २१ तोफांची सलामी दिली जाईल. राष्ट्रपतींच्या शपथविधीचा कार्यक्रम हा राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल मध्ये संपन्न होईल. त्यानंतर देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे दोघेही खास सजवलेल्या बग्गीतून देशवासियांना अभिवादन करतील.