'दाक्षिणात्य अभिनेता ही माझी ओळख असू शकत नाही!' - धनुष

    25-Jul-2022
Total Views | 59
 

dhansuh 
 
 
 
 
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने आपल्या अभिनयाने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी तसेच बॉलीवूड दोन्हीकडेही धनुषने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. पुन्हा एकदा धनुष चर्चेत आला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. साउथचा सुपरस्टार असलेला धनुष लवकरच हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. धनुषच्या आगामी 'द ग्रे मॅन' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा सिनेमा २२ जुलैला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
 
 
 
 
मुंबईत चित्रपटाच्या नुकत्याच झालेल्या प्रमोशन आणि प्रीमिअरच्या वेळी धनुषसह दिग्दर्शक अॅंथनी रुसो आणि जो रुसो देखील उपस्थित होते. यावेळी धनुषनं मिडियाशी संवाद साधला. यावेळी धनुषने सांगितले की 'मला 'दक्षिणात्य अभिनेता' म्हणून ओळखले जावे असे वाटत नाही. आम्हा कलाकारांना दक्षिण किंवा उत्तरेकडील अभिनेते न म्हणता भारतीय अभिनेते म्हटले तर मला जास्त आनंद होईल. फक्त प्रदेशापुरता मर्यादित न राहता, एकत्र येऊन काम केलं तर चांगलं काहीतरी घडू शकते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची ही चांगली संधी आहे.
 
 
 
 
केवळ दक्षिण, उत्तर किंवा प्रादेशिक उद्योगातीलच नव्हे तर राष्ट्रीय चित्रपटांसाठी आपण एकत्र काम केले आणि सर्वांसाठी चित्रपट बनवले तर खूप चांगले होईल, असं धनुषनं म्हटलं. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची ही एक चांगली वेळ असल्याचं धनुषनं म्हटलं.
 
 
 
 
पुढे धनुष म्हणतो ,'तुमचे काम उत्तम असेल तर प्रत्येक जण त्याची दखल घेईल. त्यामुळे मलाच काय तर इतर कोणालाही त्या भागावरून ओळखलं जाण्यात अर्थ नाही. मी दाक्षिणात्य आहे याचा मला अभिमान आहे परंतु त्याही आधी मी भारतीय आहे. त्यामुळे भारतीय कलाकार म्हटले तर अधिक आनंद होईल.' धनुष पहिल्यांदाच 'द ग्रे मॅन' या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करतोय. यापूर्वी तेलुगूमध्ये 'सर', हिंदीमध्ये 'रांझना', 'शमिताभ' आणि 'अतरंगी रे' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121