नवी दिल्ली : केंद्रीय स्मृती ईराणी इतक्या का संतापल्या आहेत? त्यांनी राहुल गांधींना अमेठीतून निवडून येण्याचं चॅलेंज का दिलंयं? गोव्यातील एका बारवरुन सुरू झालेला वाद आता भाजप विरुद्ध काँग्रेस, अशा रुपात लोकांसमोर येऊ लागला आहे . एखादी स्त्री सर्व पुरुषी सत्ताक बंधने तोडून स्वकर्तृत्वावर पुढे येते, स्वतःच्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्वतःचे नाव तयार करते पण याच महिलेला गप्प कारण्यासाठी तिचे खच्चीकरण करण्यासाठी स्वतःला देशातील सर्वात जुना आणि सुसंस्कृत पक्ष म्हणवणाऱ्या पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत खालच्या पातळीवर उतरतात हे सर्व भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात घडत आहे असे कोणाला खरे वाटेल का? पण हो हे भारतातच घडतंय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसला दिलेल्या आव्हानाला उत्तर म्हणून काँग्रेसी या इतक्या खालच्या पातळीवर उतरले आहेत.
राहुल गांधी आणि सोनिया गांधी या माता-पुत्रांनी स्वातंत्र्यसैनिकांचे हजारो कोटी कसे लुबाडले हे पत्रकार परिषदेतून सांगितले म्हणून काँग्रेस इतक्या खालच्यापातळीवर उतरली की स्मृती यांची १८ वर्षांची मुलगी गोव्यात बार चालवते आहे असे धादांत असत्य पसरवायला त्यांनी सुरुवात केली. गोव्यात ही मुलगी बेकायदेशीररित्या बार चालवते असा अत्यंत घाणेरडा प्रचार काँग्रेसच्या काळातील सुसंस्कृत मंत्री म्हणून नावाजलेल्या जयराम रमेश यांनी केला आहे.
काँग्रेसनेते पवन खेडा यांनीही समाजमाध्मांवरून स्मृती यांच्या विरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. स्मृती यांची १८ वर्षांची मुलगी महाविद्यालयात शिकत आहे. मात्र, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इराणींच्या मुलीच्या बदनामीचं षडयंत्र काँग्रेस नेत्यांनी रचलंयं. इराणींच्या मुलीच्या नावावर एका बारचे रेजिस्ट्रेशन कसे काय झाले, असा आरोपच जयराम रमेश यांनी केलायं. एका मृत व्यक्तीच्या नावाने लायसन्स काढून हा बार चालवला जात होता, असेही रमेश म्हणालेत. माहिती अधिकार कायद्यात मिळवलेल्या माहितीत अशी गोष्ट असल्याचा दावा रमेश यांनी केला आहे.
मात्र, इराणींनी त्यांचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. माझ्या मुलीचे नाव यात आहे हे सिद्ध करून दाखवाच, असं खुलं आव्हान त्यांनी विरोधकांना केलंयं. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेस हे सगळे करत आहे याला कारण काय तर, स्मृती इराणी यांनी काँग्रेसला आव्हान दिलं, याच स्मृती इराणी यांनी गांधी घराण्याचा घरचा समजला जाणाऱ्या अमेठी मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव केला. या सगळ्याचा सूड म्हणून काँग्रेस हे सगळे करत आहे. आता स्मृती इराणी यांनी जयराम रमेश, पवन खेडा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
या प्रकरणातून सत्य बाहेर येईलंच, स्मृती इराणींचे दावे खरे ठरतीलच, राहुल गांधींना जसे चौकीदार चोर हे या धादांत खोट्या दाव्याबद्दल न्यायालयाच्या दट्ट्यानंतर जाहीर माफी मागावी लागली होती तसंच इथंही होईल, पण यातून सर्वात मोठी गोष्ट होईल ती म्हणजे आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना गप्प करण्यासाठी देशातील सर्वात जुना, सुसंकृत पक्ष काँग्रेस किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे सिद्ध होतंयं.
काँग्रेस पुन्हा एकदा किती जंगलाची मानसिकतेची आहे, चारित्र्यहनन करण्यात कॉग्रेस एका स्त्रीलाही सोडत नाही हेच यातून जगापुढे आले आहे. पण पुन्हा पुन्हा प्रश्न विचारावासा वाटतो की राहूल गांधींकडे त्यांच्या भ्रष्ट वृत्तीचे वाभाडे काढणाऱ्या वाघीणीला सामोरे जाण्याचे धाडस आहे का ? त्यांच्यात तितकी हिम्मत आहे का? कितीही प्रयत्न करा इराणी गप्प बसणार नाहीत आणि काँग्रेसच्या भ्रष्ट, बीभत्स चेहरा त्या समोर आणताच राहतील, असा दावा लेखिका शेफाली वैद्य यांनी केला आहे.