जम्मू-काश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत सर्व नागरिकांना १२ ते १५ ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. भारत सरकारच्या या योजने अंतर्गत देशातील २० कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, असा अंदाज आहे. मात्र जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी यावर आक्षेप घेतला आहे.
जम्मू काश्मीर हे एक मुस्लीम राज्य आहे अशी मुक्ताफळंं उधळून, भारत हे एक सेक्युलर राष्ट्र असल्याने आम्ही पाकिस्तानसोबत गेलो नाही, असे विधान मुफ्ती यांनी केले. तसेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर सुद्धा मुफ्तींनी टीका केली. माजी राष्ट्रपती यांनी एक असा वारसा मागे सोडलाय ज्यामुळे संविधान पायदळी तुडवले जात आहे, असा आरोप मुफ्ती यांनी ट्वीटर द्वारे केला.
आर्टिकल ३७० असो नागरिकत्व कायदा (सीएए) असो किंवा अल्पसंख्यांक व दलितांवर झालेले हल्ले त्यांनी संविधांच्या नावावर भाजपचा राजकीय अजेंडा पूर्ण केला, अशीही टीका मुफ्तींनी केली. यापूर्वी अनेकदा मुफ्ती यांनी हर घर तिरंगा या अभियानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलेली आहे.