मुंबई : 'भाभीजी घरपर है' या लोकप्रिय मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता दिपेश भान यांचे आज निधन झाले. दिपेश सकाळी मैदानात क्रिकेट खेळायला गेले असता, थोड्यावेळाने खाली कोसळले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु, तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शुक्रवारी त्यांनी रात्रीपर्यंत मालिकेचे शूट देखील केले होते. 'भाभीजी घरपर है' या मालिकेत दिपेश 'मलखान सिंह' ही भूमिका साकारत होते. 'दिपेश यांच्या अकाली निधनाची बातमी ही सर्वांसाठी धक्कादायक आहे, अजूनही ही बातमी खोटी वाटतेय; परंतु तो आता आपल्यात नाही हे सत्य आहे' असे या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणत आहेत.
दिपेश भान यांनी दिल्लीमधून पदवीप्राप्त झाल्यानंतर थेट 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये शिकायला सुरुवात केली होती. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते २००५ साली मुंबईमध्ये आले होते. २०१९मध्ये लग्न झालेलले दिपेश २०२१ वडील झाले होते. 'भाभीजी घरपर है' या मालिकेच्या आधी 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला,' 'एफआईआर' अशा विविध कार्यक्रमांमध्ये दिपेश भान यांनी काम केले होते.