मुर्मूंना रोखल्याने विरोधकांच्या पुरोगामीपणाचा बुरखा फाटला!

चंद्रकांत पाटील यांचा विरोधकांवर आघात

    22-Jul-2022
Total Views |
 
chandrakant
 
 
 
 
मुंबई : उठता- बसता फुले शाहू आंबेडकर यांचा नावांचा वापर करायचा आणि दुसरीकडे देशाला प्रथमच एक वनवासी महिला राष्ट्रपती मिळत असताना त्यांचे पाय खेचायचे यातून विरोधकांचा पुरोगामीपणाचा बुरखा फाटलाय अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देऊन देशात इतिहास घडवण्याचे काम भाजपकडून केले जात असल्याचे विरोधकांना पाहवत नव्हते असाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
 
 
देशात प्रथमच एक वनवासी महिला राष्ट्रपती पदावर विराजमान होणार आहे, तेव्हा हा ऐतिहासिक क्षण आहे असे आवाहन एनडीएकडून केले गेले होते तरीही विरोधकांनी उमेदवार देऊन मुर्मू यांचे पाय खेचायचा प्रयत्न केलाच असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला. एवढे सगळे होऊनही खासदार आणि आमदारांनी त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान केले हे प्रत्येक राज्यात झालेल्या क्रॉस व्होटिंग मुले कळत आहे त्यामुळे विरोधकांचे ढोंग उघड झाले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.