मलाला आणि ग्रेटा कुठे गेल्या?

    22-Jul-2022   
Total Views |
 
Malala and Greta

 
 
दहा वर्षांचा कामरान आणि सहा वर्षांचा रिझवान यांना त्यांच्या वडिलाने इमरानने अबुल हसनच्या घरी घरकामाला होते. मात्र, नुकतेच अबुलने कामरान आणि रिझवान या छोट्या मुलांना इतके मारले की, त्यात कामरानचा मृत्यू झाला. अबुलने या दोन भावंडांना का मारले? तर या दोन भावंडांनी अबुलच्या म्हणण्याला विरोध केला. अबुल हा डेरा गाजी खान येथे राहत असलेल्या एका वृद्ध पीरकडे जात असे.
 
 
 
त्या पीरवर त्याची अंधश्रद्धाच होती. या पीरला या एका मुलीसोबत लग्न करायचे होते. हे दोन भावंड त्या विवाहाला विरोध करत होते. कारण, वयोवृद्ध पीरला ज्या मुलीसोबत विवाह करायचा होता, ती मुलगी या भावंडांची बहीण होती आणि तिचे वय केवळ सात वर्षे होते. आपल्या घरातील मजदूर मुल आपल्या म्हणण्याला नाकारत आहे आणि त्यातही पीरची इच्छा पूर्ण करण्यास अडसर घालत आहेत, याचा राग अबुलला आला होता.
 
 
या दोन भावंडांचा काटा काढला की, त्या मुलीला पीरसोबत लग्न करणे सोपे जाणार होते. तसे तर या मुलांचा बाप इमरानही होताच. पण, इमरानचे म्हणणे की, प्रत्यक्ष पीर आपल्या मुलीशी विवाह करणार, हे मोठे धर्माचे काम आहे. या धार्मिक कार्यासाठी आपल्या मुलीची कुर्बानी देणे, हे अहोभाग्यच असेही इमरानचे मत. पीरकडे आपली सात वर्षांची निष्पाप बालिका सोपवण्यासाठी त्याने समारंभही आयोजित केला होता. ही घटना आहे पाकिस्तानच्या लाहोरमधली. काय म्हणावे, नि:शब्द आहे. या एकाच घटनेमधून पाकिस्तानमध्ये मुली आणि बालकांची परिस्थिती कशी आहे, हे दिसून येते. आज पाकिस्तानच्या समाजमाध्यमांवरील दोन प्रमुख घटना आहेत.
 
 
एक म्हणजे इस्लामाबाद येथे रात्री बुरखा घालून एक महिला रस्त्यावरून जात होती. अचानक एक व्यक्ती पाठीमागून येऊन तिला पकडतो. तिने विरोध करताच पळून जातो. थोडक्यात, भर रस्त्यात महिलांबरोबर काहीही होऊ शकते, तर दुसरी बातमी पाकिस्तानच्याच पोर्ट मुनरो इथली. सध्या समाजमाध्यमामुळे जग एक खेडे बनले आहे.
 
 
 
‘टिकटॉक’ आणि ‘ब्लॉग’च्या माध्यमातून अमेरिकेच्या एका युवतीची ओळख आणि ऑनलाईन मैत्री पाकिस्तानच्या मुजमिल सिप्रा आणि अजान खोसा या दोघांशी झाली. या दोघांच्या सोबत ‘ब्लॉग’ बनवण्यासाठी ती 21 वर्षांची अमेरिकन युवती पाकिस्तानला आली. मात्र, ती पाकिस्तानमध्ये आल्यावर या मुजमिल आणि अजान या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. दुष्कर्माचे व्हिडिओ काढले आणि तिला ‘ब्लॅकमेल’ करायला सुरुवात केली.
 
 
या दोन घटनांमुळे पाकिस्तानमधील मानवी हक्कांसाठी काम करणार्याु संस्था हवालदिल झाल्या. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, परदेशातील आधुनिक कपड्यातली युवतीच नव्हे, तर स्वतःच्या देशातली परदानशीन युवतीही पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाही. आता यावर कडी करणारी घटना म्हणजे काही दिवसांपूर्वीचपाकिस्तानमध्ये एका पोलीस महिलेने तक्रार नोंदवली.
 
 
 
पोलिसी कर्तव्य पार पाडत असताना तिच्या सहयोगी पोलिसाने तिला चहा प्यायला दिला. त्यात नशेचा वापर केला होता. महिला पोलीस बेशुद्ध झाल्यावर तिच्या सहयोगी पोलिसाने तिच्यावर अत्याचार केला आणि त्या घटनेचे व्हिडिओ बनवले. त्यानंतर सातत्याने तो तिला ‘ब्लॅकमेल’ करत राहिला. ही घटना सांगण्याचा उद्देश हाच की, जिथे पोलीस कर्मचारीच सुरक्षित नाहीत, तिथे या देशातील इतर मुलीबाळींच्या सुरक्षिततेचे काय होणार? पाकिस्तानमध्ये दररोज असे काही ना काही घडते.
 
 
 
दि. 14 जुलै रोजी कराची येथे शाळेच्या कँटिनमधील मोठ्या कढईत एका स्त्रीचा मृतदेह मिळाला. तिच्या नवर्या ला आशिकला संशय होता की, तिचे परपुरूषासोबत संबंध असावेत. त्या संशयातून त्याने उशीने तोंड दाबून तिचा खून केला. या दोघांना सहा मुलं आहेत. या सहा मुलांसमोरच त्याने या महिलेचा मृतदेह कढईत टाकून उकळवला, तर दुसरीकडे एका चार वर्षांच्या चिमुरड्याचा तुकडे झालेला देह मिळाला. कारण काय? तर तिच्या पित्याला वाटले की ती त्याची मुलगी नाही. भयंकर!!
 
 
 
पाकिस्तानमध्ये केवळ राजकीय आणि आर्थिक अराजकच नाही तर भयंकरापेक्षा भयंकर सामाजिक अराजकही पेटले आहे. या वणव्यात होरपळत आहेत त्या तिथल्या मुलीबाळी, लेकीसुना. पाकिस्तानची मलाला युसूफजाई म्हणा किंवा आखाती देशाची मिया खलिफा म्हणा किवा पाश्चात्य देशाची ग्रेटा थनबर्ग म्हणा, यांना भारतातल्या शाहीनबाग किंवा शेतकर्यांतच्या आंदोलनाबाबत भारी कळवळा होता. पण, पाकिस्तानध्ये मुलींवर होणार्याा अत्याचाराबाबत यांच्या संवेदना मेल्या आहेत का?
 
 
9594969638
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.