मुंबई : पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी अर्बन नक्षल गौतम नवलाखाला तुरुंगातून फोन तसेच व्हिडिओ कॉल करण्यास परवानगी देता येणार नाही असे राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषद प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी गौतम नवलाखा एक आहे. नवलखावर दहशतवादाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला अशा प्रकारची कुठलीही परवानगी देता येणार नाही असे राज्य सरकारकडून सरकारी वकील संगीता शिंदे यांनी स्पष्ट केले.
आपली पत्नी वयोवृद्ध असून ती दिल्ली येथे राहते. तिला वयोमानामुळे मला भेण्यासाठी सतत मुंबईत येणे शक्य नाही त्यामुळे मला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी नवलाखाने आपले वकील चौधरी यांच्या मार्फत केली होती. राज्य सरकारने नवलाखा याच्यावरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा प्रकारची कुठलीही परवानगी त्याला देणे धोकादायक आहे असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.