गैरप्रकारातून वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर त्वरित नियमानुसार कारवाई करा- श्री. चंद्रकांत डांगे

    20-Jul-2022
Total Views | 75

electyricity
 
 
वाशी:  महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत ग्राहकांना उत्तम वीजसेवा देण्यासाठी, ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे देयक वसूल करण्यासाठी, स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलासाठी संबंधित ग्रामपंचायतींशी तसेच इतर शासकीय यंत्रणांशी पाठपुरावा करून वसुली करण्याबाबत व ज्या मीटर रीडिंग एजेन्सिंचा रीडिंग मुख्यालयाकडून नाकारण्यात आला होता, अशा एजेन्सींच्या प्रतिनिधींना प्रत्यक्षात भेटून योग्य मार्गदर्शन करण्यासाठी, कोंकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री.चंद्रकांत डांगे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.धनंजय औढेंकर प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय, दोन्ही मंडळाचे अधीक्षक अभियंता, श्री.अरविंद बुलबुले व श्री.राजाराम माने, प्रादेशिक विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं) श्री.सुनील पाठक, कार्यकारी अभियंते व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
 
 
प्रत्येक उपविभागाच्या कामाचे स्वतंत्रपणे आढावा घेऊन त्यांना वीजबिल वसुलीवर भर देण्यासाठी, चांगली वीज सेवा देण्यासाठी तसेच मीटर रीडिंग एजेन्सीच्या प्रतिनिधींना आपल्या कामात सुधारणा करून अचूकप मीटर रीडिंग घेण्याचे कडक निर्देश श्री. डांगे यांनी दिले. ते म्हणाले, “वीज ही एक मुलभूत गरज असून विजेशिवाय कोणीही असू शकत नाही म्हणून वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीजजोडणी तपासून काही गैरप्रकार आढळ्यास संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठा योजनांच्या वीजबिलाची थकबाकी वसुलीसाठी संबंधित ग्रामपंचायतींशी पाठपुरावा करून वीजबिल वसुली करावी.
 
 
महावितरणच्या ग्राहकांना, वेळेवर व अचूक वीज देयक देण्यासाठी मीटर रीडिंग एजेन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, काही एजेन्सीचे मीटर रीडिंग फोटो योग्य पद्धतीने न घेतल्यामुळे मुख्यालयाकडून नाकारण्यात आली आहेत. म्हणून मीटर रीडिंग एजन्सीने याकामात गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. योग्य वेळेत तसेच अचूक रीडिंग भेटल्यास महावितरणला ही ग्राहकांना वेळेवर अचूक देयक देणे शक्य होत असते. चालू बिलासोबातच थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अभियंत्यांना दिले. जे ग्राहक वीजबिल भरण्यास टाळाटाळ करत असतील अशा ग्राहकांचा वीजपुरवठा त्वरित खंडित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121