मोहम्मद जुबेरला दंगली घडवण्याचे ट्विट करण्यासाठी मिळायचे २ कोटी?

    20-Jul-2022
Total Views |
Zubair
 
 
 
 
 

नवी दिल्ली: ऑल्ट न्यूजचा सह-संस्थापक मोहम्मद जुबेर  याला उत्तर प्रदेशमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये बुधवार दि. २० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला. उत्तर प्रदेश पोलिसांमधील एफआयआर आणि दिल्ली पोलिसांच्या एफआयआरचे गांभीर्य सारखे असतानाही याचिकाकर्त्याला सतत कोठडीत ठेवणे योग्य नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
 
 

झुबेरच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या याचिकेत झुबेरने यूपीमधील आपल्याविरुद्धचे सर्व एफआयआर रद्द करावेत, अशी मागणी केली होती. तसेच त्यांच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र, उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी या याचिकेला विरोध केला. त्याने न्यायालयाला सांगितले आहे की झुबेर त्याच्या ट्विटसाठी पैसे घेत असे आणि शुक्रवारी लोकांना भडकावायचे आणि जातीय हिंसाचार पसरवायचे. एका ट्विटसाठी १२ लाख रुपये आणि एका ट्विटसाठी 2 कोटी रुपये मिळाल्याचे झुबेरने मान्य केले आहे.