मुंबई : आरेतील ‘मेट्रो ३`च्या कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात नवनिर्वाचित शिंदे सरकार स्थापन होताच या सरकारने रखडलेल्या ‘मेट्रो ३` प्रकल्पाला गती देण्यासाठी मेट्रोची कारशेड आरेतच करण्याचा निर्णय घेतला. “मुंबईकरांच्या हितासाठी जर लवकरात लवकर मेट्रो सुरू करायची असेल, तर कारशेड आरेतच झाले पाहिजे. यासाठी आमचा हाच निर्णय असेल की, कारशेड आरेतच केली पाहिजे,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, “ ‘मेट्रो ३`चे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र, जोपर्यंत या कारशेडचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही मेट्रो सुरू होऊ शकत नाही. मागच्या सरकारने प्रस्तावित केलेली जागा अडचणीत आहे. ती जागा मिळाली, तरी त्या जागेवर आणखी चार वर्षे कारशेड होऊ शकत नाही. आमच्या सरकारच्या काळात आरेतील जागेला सर्वोच्च न्यायालयानेही मंजुरी दिली होती. त्या जागेवर २५ टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित ७५ टक्के कामही तिथे तत्काळ पूर्ण केले जाऊ शकते. म्हणून मुंबईकरांच्या हितासाठी जर लवकरात लवकर मेट्रो सुरू करायची असेल, तर कारशेड तिथेच झाली पाहिजे. यासाठी आमचा हाच निर्णय असेल की, कारशेड आरेतच केली पाहिजे.
पुढे उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंचा आदर राखत मी इतकेच सांगेन की, मी त्यांना वारंवार विनंतीही केली होती, तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवा आणि कारशेडला आरेतच करायला मंजुरी द्या. कारशेडचे प्रकरण न्यायालयात गेले. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, हरित लवाद सगळीकडे मंजुरी मिळाल्यांनतरच आरेचा निर्णय झाला. माझा एक प्रश्न आहे की, त्याच आरेच्या आजूबाजूला बिल्डर्सना झाडे तोडण्यास, तर तुम्ही परवानगी दिली. ज्या सार्वजनिक वाहतुकीसाठी हे करतोय त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात म्हटले आहे की, जेवढी झाडे तोडण्यात आली, ती झाडे त्यांच्या आयुमर्यादेत जेवढा कार्बन घेणार आहेत ते ही मेट्रो ८० दिवसांत करणार आहे. अशावेळी हा मुद्दा राजकीय केला जाऊ नये,” असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत या प्रस्तावावर टीका करताना म्हणाले की, “कदाचित आज पहिल्यांदाच माझा चेहरा पडलेला तुम्हाला दिसत असेल. कारण, आज दु:ख झाले ते एका गोष्टीचे. माझ्यावर राग आहे ना, मग तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा, पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईकरांवर काढू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजुरमार्गचा जो एक प्रस्ताव आम्ही दिलेला आहे, त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्यावतीने हात जोडून त्यांना विनंती करतो की, आपला आरेचा जो आग्रह आहे तो रेटू नका. कारण, मुंबईच्या पर्यावरणाला हानी पोहोचेल.”
बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं. भारतीय कुस्ती महासंघाकडं याविषयी तक्रार देखील करण्यात आली होती. या बरखास्तीनंतर नव्यानं निवडणूक घेऊन भारतीय कुस्तीगीर परिषद गठीत करण्यास सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये 'महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे' आयोजन 'महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदे'तर्फे करण्यात येते.