मुंबई : दोन वर्षांपासून रखडलेल्या एमपीएससीच्या परीक्षा आणि भरती प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु करण्यात याव्यात आणि मुलांचे प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासर्व प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्र्यांची विद्यार्थ्यंनी भेट घेतली.
कोरोना काळामुळे गेली दोन वर्षे या नियुक्त्या रखडलेल्याच आहेत. परीक्षांच्या तारखा सातत्याने पुढे ढकलल्या जाणे, निकाल वेळेवर न लागणे, यासारख्या समस्यांचा सामने हे विद्यार्थी गेले दोन वर्षे करत आहेत. या सर्व मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून आंदोलनेही झाली आहेत तरीही महाविकास आघाडी सरकारकडून त्यांची दाखल घेतली गेली नव्हती पण आता तरी फडणवीस- शिंदे सरकारकडून तरी या प्रश्नांची दाखल घेतली जावी आणि हे प्रश्न सोडवले जावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.