
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध गायक केके याच्या अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. केकेचे निधन होऊन आता जवळपास दीड महिना उलटला आहे. नुकतेच केके याच्या पत्नीने म्हणजेच ज्योती कृष्णाने सोशल मिडीयावर त्यांचे एक सुंदर पेंटिंग शेअर करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. केकेचे चाहतेच जर त्याला एवढे मिस करत आहेत तर तेथे त्याच्या पत्नीची वेगळी काय गत असणार, हे सांगायला नको. साहजिकच ज्योती केकेला खूप मिस करत आहे. त्यामुळे तिने शेअर केलेले त्यांचे पेंटिग बघून केकेचे चाहते सुध्दा भावूक झाले आहेत.
३१ मे रोजी गायक केके याचे कोलकत्ता येथील लाईव्ह शो सुरु असतना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह चाहत्यांनाही हा मोठा धक्का होता. केकेची पत्नी ज्योती कृष्णाने एका पेंटिंग सोशल मिडीयावर शेअर केली आहे. हे पेंटिंग तिने स्वतःने काढले आहे. दिवंगत गायक केके पत्नी ज्योतीसोबत या पेंटिंगमध्ये दिसत आहे.
या पेंटिंग खाली तिने लिहिले आहे, 'आज पुन्हा पेंटिंग करायचा प्रयत्न केला आहे. तुझी खूपच आठवण येतेय.' 'केके यांच्या पत्नी ज्योती कृष्णा या व्यवसायाने चित्रकार आहेत. केकेच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदाच पेंटिंग बनवली आहे. त्यांनी आपली ही पेंटिंग इन्स्टाग्रामवर शेअर करत आपण केकेला मिस करत असल्याचं तिने सांगितले आहे. ज्योती कृष्णा यांना आपल्या भावना आवरणं कठीण होत आहे. पतीच्या निधनाच्या दीड महिन्यांनंतर त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. केकेचे चाहते देखील त्याला खूप मिस करत आहेत त्यामुळे हे पेंटिंग पाहून ते देखील अतिशय भावुक झाले आहेत.