भोपाल: मध्य प्रदेश पोलिसांनी इंदोरमधील भामोरी क्रॉसरोडवर गुरुवारी दि. १४ रोजी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या एका पुरुष आणि एका महिलेला अटक केली. दुचाकीवरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिला व तिच्या साथीदाराला वाहतूक पोलिसांनी अडवले. त्यानंतर दोघांनी अधिकाऱ्यावर हल्ला केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वृत्तानुसार, बुरखा घातलेल्या महिलेसोबत आलेल्या व्यक्तीचे नाव सोहेल असे आहे. इंदूरमधील भामोरी चौकात रणजित सिंग नावाचा वाहतूक पोलिस ड्युटीवर असताना गुरुवारी दि. १५ रोजी संध्याकाळी ही घटना घडली. त्यांनी दोन व्यक्तींना चुकीच्या पद्धतीने वाहन चालवताना पाहिले आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना थांबवले. त्यानंतर दोघांनी अचानक अधिकाऱ्याशी भांडण सुरू केले याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, आणि इंटरनेटवर शेअर केला गेला.
व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहे तर तिचा साथीदार सोहेल या हल्ल्यात तिला साथ देताना दिसत आहे. दरम्यान, पोलिस हा हल्ला टाळताना दिसत आहेत, परंतु बुरवा घातलेली महिला पोलिस कर्मचाऱ्याला वारंवार मारहाण करत आहे. लोक या घटनेचे साक्षीदार म्हणून जमले असताना, व्हिडिओ शूट करण्यात आला आणि लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
वृत्तानुसार, सिंग यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली ज्यांनी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल महिला आणि तिचा पुरुष मित्र सोहेल यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. ट्रॅफिक डीसीपी बसंत कोल यांनीही या घटनेला दुजोरा दिला आणि सांगितले की, आरोपी सोहेलवर त्याच्या नावावर आधीच तीन गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी विजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.